Home Uncategorized कोडोली येथे गजानन महाराज पुण्यतिथी साजरी

कोडोली येथे गजानन महाराज पुण्यतिथी साजरी

3 second read
0
0
179

पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील रायगड कॉलनी सुतारकी येथील श्री आत्मलिंगेश्वर मंदिरात तसेच वारणानगर येथील गजानन महाराज मंदिरात शेगावचे संत शिरोमणी समर्थ सदगुरू श्री गजानन महाराज यांची ११५ वी पुण्यतिथी भक्तीभावाने साजरी करण्यात आली.
श्री गजानन महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने सालाबादप्रमाणे “श्री” च्या मुर्तीस शोडोपचार अभिषेक,प्रतिमा पूजन,गजानन विजय ग्रंथाचे सामुदायिक पारायण भाविकांच्या उपस्थितीत पार पडले.महाआरती नंतर प्रसाद वाटप करण्यात आले.
वारणानगर येथील मंदिरात श्री गजानन महाराज यांच्या मूर्तीस संतोष जंगम यांच्या हस्ते सपत्नीक अभिषेक करण्यात आला.
तर रायगड कॉलनी सुतारकी येथील श्री आत्मलिंगेश्वर मंदिरात श्री गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन दिलीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जेष्ठ मार्गदर्शक आर. एस. पाटील सौ. भारती पाटील,सौ.सुशिला होसमनी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.यावेळी मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या..

केके न्युजसाठी कोडोलीहुन – सनी काळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…