Home Uncategorized पद्मश्री सुरेश वाडकर यांच्या वाढदिनी कोल्हापूरातील चाहते देणार संगीतमय शुभेच्छा कॅराओके मैफिलीचे आयोजन.

पद्मश्री सुरेश वाडकर यांच्या वाढदिनी कोल्हापूरातील चाहते देणार संगीतमय शुभेच्छा कॅराओके मैफिलीचे आयोजन.

3 second read
0
0
116

कोल्हापूरच्या मातीत घडलेला एक महान कलाकार म्हणून पद्मश्री पंडीत सुरेश वाडकर यांचा सर्व कोल्हापूरकरांना विशेष अभिमान आहे. त्यांच्या बद्दलचा हाच अभिमान आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून पंडीत सुरेश वाडकर प्रेमी ग्रुपने सुरेल संगीत मैफिल या कॅराओके मैफिलीचे आयोजन केले आहे.7 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.00 वाजता कोल्हापूर मधील राजर्षी शाहू स्मारक भवनात ही मैफिल रंगणार आहे. या मैफिलीतून संकलित होणारा निधी समाजातील गरजुंना दिला जाणार असल्याचे पंडीत सुरेश वाडकरप्रेमी ग्रुपचे प्रमुख अनिल एच मोरे यांनी सांगितले.

पंडीत सुरेश वाडकर यांनी संगीत क्षेत्रात दिलेल्या योगदाना बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या मैफिलीचे आयोजन करणेत आले आहे. सुरेशजींचे जन्मगांव दिंडनेर्लीचे सुपुत्र सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार डोईजड यांच्या हस्ते या मैफिलीचा शुभारंभ होणार आहे.यावेळी सुरेशजींचे निस्सीम चाहते सर्जेराव सांगले उपस्थित राहणार आहेत.
या मैफिलीत आपल्या आवाजाने प्रति सुरेश वाडकर अशी ओळख निर्माण केलेले पद्माकर कुरकुटे,इचलकरंजी यांच्या सह व्यावसायिक व हौशी कलाकार सुरेश वाडकर यांनी गायलेली गीते सादर करत त्यांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा देणार असल्याचे कृष्णात जमदाडे यांनी सांगितले.
यावेळी पंडित सुरेश वाडकर प्रेमी ग्रुपचे अनिल मोरे,कृष्णात जमदाडे तसेच परिसरातील पत्रकार उपस्थित होते.

केके न्युजसाठी वारणानगरहुन_सनी काळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…