Home Uncategorized कुंभोज गावाची नाहक बदनामी; ग्रामस्थांकडून पोलिस ठाण्यात निवेदन

कुंभोज गावाची नाहक बदनामी; ग्रामस्थांकडून पोलिस ठाण्यात निवेदन

2 second read
0
0
354

हातकणंगले प्रतिनिधी – सचिन लोंढे


आज काही वर्तमानपत्रांमध्ये “कुंभोज येथे कुंटण खान्यावर छापा” अशा नावाने फोटोसह बातमी प्रसिद्ध झाली. या बातम्यांमुळे कुंभोज गावाची बदनामी झाली असून, जिल्हाभर चर्चा सुरू झाली आहे. मात्र, ही घटना प्रत्यक्षात कुंभोज गावाच्या हद्दीत घडलेली नसून, या बातम्यांचा गावाशी काहीही संबंध नाही.

पोलिसांनी पत्रकारांना दिलेल्या चुकीच्या प्रेस नोटमुळे ही बातमी प्रसिद्ध झाली, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यामुळे गावात संताप व्यक्त करण्यात आला. या प्रकाराला विरोध करत कुंभोज ग्रामस्थांनी हातकणंगले पोलिस ठाण्यात निवेदन दिले.

या वेळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच आप्पासाहेब पाटील, सदानंद महापूरे, सचिन भानुसे, पत्रकार सचिन लोंढे, पत्रकार शकील सुतार, वसंत कांदेकर, छत्रपती राजाराम कारखाना संचालक अमित साजनकर, पत्रकार विनोद शिंगे, योहान घाटगे, सागर सुवासे, सुरेश भगत, विनायक पोद्दार, विश्वजीत माने व इतर गावकरी उपस्थित होते.

या वेळी पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांनी सांगितले की, “सदर तपास रात्री झाला असल्याने पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारेच प्रेस नोट देण्यात आली. संबंधित भागाची सीमा स्पष्ट नसल्यामुळे गावाचे नाव चुकून नमूद झाले असावे. तसंच त्या ठिकाणी कोणताही कुंटणखाना चालत नाही,” असा स्पष्ट खुलासा त्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…