
पन्हाळा तालुक्यातीलपोर्ले येथील पोर्ले ते निटवडे रोडवर एका विकास सेवा संस्थेच्या समोर रहदारीच्या रस्त्यालगत गांजा सेवन करताना १) तेजस उत्तम कांबळे वय २४, २) पृथ्वीराज गुरूदास चोपडे वय १९, ३) आदित्य आनंदा बुचडे. वय-२१ तिघेही रा. पोर्ले, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर या तीन मजुरांना पन्हाळा पोलीसांनी ताब्यात घेतले.ही कारवाई सपोनी संजय बोंबले,पीएसआय कोंडुभैरी,पोलीस हवालदार वायदंडे व पोलीस शिपाई निलेश पडवळ यांच्या पाथकाने केली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी,पन्हाळा पोलीसांचे गस्ती पथकाची बुधवारी सायंकाळी पोर्ले परिसरात गस्त चालू होती. हे गस्ती पथक पोर्ले गावातून जात असता निटवडे रोडवर एका विकास सेवा संस्थेच्या समोर रहदारीच्या रस्त्यालगत तेजस कांबळे,पृथ्वीराज चोपडे ,आदित्य बुचडे हे तिघे संशयस्पद बसलेले दिसले. त्यामुळे त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे गांजा सेवनासाठी सिगरेट बनविण्याचा रोलिंग पेपर, काळया रंगाचा जळालेला गांजा व एक आगपेटी असे साहित्य मिळून आले.तेव्हा त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गांजा सेवन करत असल्याची कबुली दिली. यावरून पन्हाळा पोलिसांनी गुन्हा नोद करत त्या तिघांना ताब्यात घेतले असून याबाबतची फिर्याद पथकातील पोलीस शिपाई निलेश नामदेव पडवळ यांनी दिली आहे.अधिक तपास सहाय्यक फौंजदार सुरेश खोत करीत आहेत.


