Home Uncategorized इंजोळे गावात मा जिल्हाधिकाऱ्यांचा एक दिवस बळीराजासाठीकृषी विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नाविन्यपूर्ण उपक्रम

इंजोळे गावात मा जिल्हाधिकाऱ्यांचा एक दिवस बळीराजासाठीकृषी विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नाविन्यपूर्ण उपक्रम

3 second read
0
1
110

प्रतिनिधी – सचिन वरेकर

माननीय मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमा निमित्त कोल्हापूरचे माननीय जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे यांनी इंजोळे गावात भेट दिली सर्वप्रथम वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर गावातील प्रगतशील शेतकरी मानसिंग पाटील यांच्या शेतावर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः शेतात उतरून चिखलणी केली व चार सुत्री पद्धतीने भाताची रोप लागण केली त्यावेळी कृषी विभागाचे उप कृषी अधिकारी तानाजी पाटील यांनी भाताच्या चार सुत्री लागवडीबद्दल मार्गदर्शन केले त्यानंतर उपविभागीय कृषी अधिकारी पोपट पाटील यांनी जमीन सुपीकता निर्देशांकद्वारे खताचा वापर व कृषी विभागाच्या इतर योजनांबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच नाचणी सुधार प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ उदय बने यांनी नाचणी विषयी मार्गदर्शन केले त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित शेतकऱ्यांबरोबर संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या त्यावेळी शेतकऱ्यांनी त्यांचे अनेक प्रश्न मांडले त्यामध्ये रोटावेटर मुळे होणारे अपघात वन्य प्राण्यांमुळे होणारे नुकसान तसेच अतिवृष्टीमुळे होणारे नुकसान व त्याची नुकसान भरपाई या विविध प्रश्नांवर चर्चा केली
त्यानंतर गावातील ऑर्चिड फुल शेती केलेल्या प्रगतशील शेतकरी तुकाराम पाटील यांच्या हरितगृहाला भेट दिली
या उपक्रमामध्ये तहसीलदार माधवी शिंदे जाधव गट विकास अधिकारी सोनाली माडकर तालुका कृषी अधिकारी काव्यश्री घोलप सहाय्यक कृषी अधिकारी अमृता भोसले कैलास कदम ग्राम महसूल अधिकारी विशाल पाटील ग्राम विकास अधिकारी माधुरी साळुंखे एटीएम विश्वजीत पाटील बीटीएम राजगोंडा चौगुले तसेच गावच्या सरपंच अनिता पाटील उपसरपंच मधुकर कांबळे रोजगार सेवक नितीन पाटील कृषीसखी राजश्री गवळी पोलिस पाटील शहाजी पाटील तसेच प्रगतशील शेतकरी रामचंद्र पाटील तानाजी कोंडे कृष्णात गायकवाड लक्ष्मण पाटील व मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…