Home Uncategorized स्वाभिमानी शेतकरी संघटनचे सावकार मादनाईक यांचा आज भाजप प्रवेश

स्वाभिमानी शेतकरी संघटनचे सावकार मादनाईक यांचा आज भाजप प्रवेश

4 second read
0
0
125

जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सावकार मादनाईक यांचा बुधवारी (ता. २) दुपारी मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश निश्चित झाला आहे.

यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे, आमदार डॉ. अशोकराव माने, आमदार राहुल आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर, भाजप किसान मोर्चाचे राज्य सचिव भगवान काटे यांच्यासह विजय माणगावे, मिलिंद साखरपे, सतीश हेगाणा, शैलेश आडके, उपस्थित राहणार आहेत.

मादनाईक यांच्या रूपाने भाजपला शेतकरी चळवळीच्या मुशीत तयार झालेले नेतृत्व मिळणार आहे. २००२ पासून श्री. मादनाईक यांनी स्वाभिमानीचे अध्यक्ष शेट्टी यांना सावलीप्रमाणे साथ दिली आहे. विधानसभा निवडणुकीत शेट्टी यांची तिसऱ्या आघाडीची भूमिका न पटल्याने मादनाईक यांनी वेगळी चूल मांडली. दरम्यान, मादनाईक यांच्या भाजप प्रवेशात गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका घेतली आहे. मादनाईक यांच्या प्रवेशासाठी मुंबईतही बैठका झाल्या आहेत. मादनाईक यांनी स्वाभिमानी सोडू नये यासाठी गेल्या काही दिवसांपासून जोरदार प्रयत्न सुरू होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…