Home Uncategorized लघु पाटबंधारे मान्यतेसाठी आ. कोरे यांची मंत्री राठोड यांच्याशी भेट

लघु पाटबंधारे मान्यतेसाठी आ. कोरे यांची मंत्री राठोड यांच्याशी भेट

3 second read
0
0
249

मुंबई (मंत्रालय) येथे महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री नामदार संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली शाहूवाडी तालुक्यातील शिराळे तर्फ मलकापूर येथे लघु पाटबंधारे तलावाची प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

शाहूवाडी तालुक्यातील शिराळे तर्फ मलकापूर येथे लघु पाटबंधारे तलाव करणे नियोजित आहे. सदर तलावामुळे ८०३.८३ स.घ.मी. इतका पाणीसाठा उपलब्ध होणार असुन ११० हे. क्षेत्र सिंचनाखाली आणणे शक्य होणार आहे. सदर योजनेस आवश्यक असणारे पाणी उपलब्धता प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

या योजनेमुळे शिराळे तर्फ मलकापूर गावासह परिसरातील गावाच्या शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात मदत होणार आहे. सदर गावातील लोकांचा तलाव होणेबाबत आग्रही मागणी असल्यामुळे या योजनेचे प्रशासकीय अंदाजपत्रक सादर केले आहे.तरी सदर योजनेस शासनाकडून प्रशासकीय मान्यता लवकरात लवकर मिळावी अशी मागणी आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी मृद व जलसंधारण मंत्री नामदार संजय राठोड यांच्याकडे केली.

यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील (पेरीडकर) आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मलकापूर येथे एस.टी. बसथांबा व रात्री १० वाजेची बससेवा सुरू करण्याची मागणी

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते: मलकापूर शहरातील नागरिक, विद्यार्थी, नोकरदार, महिला व ज्येष…