
धरणगुत्ती तालुका शिरोळ येथे अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीचा प्रियकर व त्याच्या साथीदारांच्या मदतीने खून केल्याप्रकरणी पत्नीसह चौघांना बुधवारी रात्री उशिरा शिरोळ पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. त्यांना गुरुवारी जयसिंगपूर येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पुढील तपासासाठी दिनांक १३ मार्चपर्यंत सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. संजय अल्लाबक्ष शिकलगार ( वय ३८, मूळ रा., यादवनगर जयसिंगपूर, सध्या रा. लक्ष्मीनगर धरणगुत्ती असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मयताची पत्नी दीपाली संजय शिकलगार, (राहणार लक्ष्मीनगर धरणगुत्ती,) प्रियकर दर्शन भगवान कांबळे, त्याचा भाऊ अमृत भगवान कांबळे ( दोघे मूळ राहणार, धरणगुत्ती, सध्या राहणार, चिपरी, तालुका शिरोळ ) स्वागत विजय कांबळे, ( मुळ राहणार आंबेडकरनगर कसबा बावडा, सध्या राहणार माळभाग धरणगुत्ती) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

ही कारवाई पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक आय. बी.मुल्ला, गिरीश शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल बाबाचांद पटेल, विजय भांगरे, संग्राम खराडे, दिलीप कुंभार, सुशांत ठोंबरे, रहिमान शेख, कडुबा जाधव, संजय राठोड यांच्यासह पथकाने केली.


