Home Uncategorized दंगलमुक्त गाव संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रभर राबविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार – आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर

दंगलमुक्त गाव संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रभर राबविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार – आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर

6 second read
0
0
49

जयसिंगपूर : प्रतिनिधी
तंटामुक्त अभियानाबरोबरच दंगलमुक्त अभियानही राबवले पाहिजे. ही संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रभर ग्रामीण आणि शहरी भागात पोहोचवण्यासाठी मी शासनस्तरावर प्रयत्न करेन. अशा उपक्रमांमुळे गावाच्या विकासाला मोठी चालना मिळेल. असे प्रतिपादन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.
ऑल इंडिया बहुजन समन्वय समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या औचित्याने चिपरी ग्रामपंचायतीमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रातील पहिल्या ऐतिहासिक ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या चिपरी गावाने ग्रामसभेत “शिव-फुले-शाहू-आंबेडकर दंगलमुक्त गाव” अभियान राबवण्याचा ठराव संमत केला होता. या ठरावाला शासनस्तरावर पाठपुरावा करून आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या कार्यासाठी त्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी सरपंच निर्मला कोळी, विद्यमान सरपंच दीपिका परीट, जयसिंगपूर पोलीस स्टेशनचे पीआय सत्यवान हाके, ग्रामविकास अधिकारी कारखेले यांचा लिंगायत धर्मगुरू उस्तुरी मठाचे मठाधिपती परमपूज्य कोरणेश्वर महास्वामीजींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

स्वागत रुस्तुमभाई मुजावर यांनी केले, तर प्रास्ताविक ऑल इंडिया बहुजन समन्वय समितीचे संघटक हाजी मुबारक फरास यांनी करून कार्यक्रमाचे महत्त्व विशद केले. महास्वामीजींनी या कार्यक्रमाचे उत्तम संयोजन केल्याबद्दल समाधान व्यक्त करत सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे संयोजन डॉ. बरकत मुजावर व त्यांच्या संपूर्ण टीमने केले.

यावेळी माजी सरपंच सुदर्शन पाटील, तातोबा कोरे, ग्रामपंचायत सदस्य म्हाळू गावडे, मुसाभाई फकीर, अ‍ॅड. डी. जी. जगदाळे, मुजीब कोल्हापूरे, नबीलाल नदाफ, तलक मुजावर, मंझील अतार, शहाजान मुजावर तसेच आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार सरपंच सौ. दीपिका नितीन परीट यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…