Home Uncategorized स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील स्मृतीप्रित्यर्थ पुरस्कारांची घोषणा ; १ एप्रिल रोजी वितरण ; मेधा पाटकर, विलासराव शिंदे, स्वप्निल कुसळे यांना पुरस्कार जाहीर

स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील स्मृतीप्रित्यर्थ पुरस्कारांची घोषणा ; १ एप्रिल रोजी वितरण ; मेधा पाटकर, विलासराव शिंदे, स्वप्निल कुसळे यांना पुरस्कार जाहीर

4 second read
0
0
117

शिरोळ : प्रतिनिधी

स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची यंदाची निवड जाहीर झाली आहे. यामध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर यांना समाजभूषण पुरस्कार, नाशिक येथील प्रयोगशील शेतकरी बिलासराव शिंदे यांना समाजकार्य पुरस्कार, तर कोल्हापूर जिल्ह्याचे सुपुत्र व ऑलिम्पिक पदक विजेता जलतरणपटू स्वप्निल कुसळे यांना प्रेरणा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कारांचे वितरण मंगळवार, दि. १ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता संपादक गिरीश कुबेर यांच्याहस्ते के. दत्ताजीराव कदम क्रीडांगण, दत्तनगर, शिरोळ येथे होणार असल्याची माहिती दत्त उद्योग समुहाचे प्रमुख गणपतराव पाटील व विनोद शिरसाठ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्र राज्याचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी सहकार, कृषी आणि उद्योगाच्या माध्यमातून समृद्ध महाराष्ट्राचे स्वप्न पाहिले. याच ध्येयाने प्रेरित होऊन स्व. डॉ. आप्पासाहेब पाटील यांनी शिरोळ तालुक्यात सहकारी साखर कारखानदारीची पायाभरणी केली. या माध्यमातून परिसराच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना मिळाली. सन १९५५ ते २०१५ या साठ वर्षांच्या कालावधीत त्यांनी महाराष्ट्र विधानसभेत आमदार आणि श्री दत्त कारखान्याचे चेअरमन म्हणून जबाबदारी सांभाळली, सहकार, शेती, शिक्षण आणि समाजकार्यातील योगदानामुळे त्यांचा लौकिक सहकार महर्षी असा झाला.
त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी २०१५ पासून समाजभूषण पुरस्कार सुरू करण्यात आला. हा पुरस्कार सहकार, शेती, शिक्षण, समाजकार्य किंवा उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाच्या व्यक्तींना दिला जातो. याआधी एन. डी. पाटील, गणपतराव देशमुख, शरद पवार, मीरा बोरवणकर, डॉ. राजेंद्रसिंह राणा आदी मान्यचरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

मागील दोन वर्षांपासून पुरस्कार निवड समितीने समाजात परिवर्तन घडवणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी समाजकार्य पुरस्कार आणि कोल्हापूरच्या लौकिकात भर घालणाऱ्या व्यक्तीसाठी प्रेरणा पुरस्कार सुरू केला. याआधी डॉ. सुधीर भोंगळे, भास्करराव पेरे-पाटील (समाजकार्य पुरस्कार) आणि राही सरनोबत, अमृता पुजारी (प्रेरणा पुरस्कार) यांना हा सन्मान देण्यात आला आहे. यंदाच्या पुरस्कारांसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर, प्रयोगशील शेतकरी विलासराव शिंदे, आणि जलतरणपटू स्वप्निल कुसळे यांची निवड करण्यात आली आहे.

या पत्रकार परिषदेला दत्त उद्योग समुहाचे प्रमुख गणपतराव पाटील, विनोद शिरसाठ, दत्तचे चेअरमन रघुनाथ पाटील, मॅनेजिंग डायरेक्टर एम. व्ही. पाटील, व्हा. चेअरमन रघुनाथ पाठक, सेक्रेटरी अशोक शिंदे, वैभव उगळे, सर्जेराव पवार, श्रीशैल हैगाण्णा, दिलीप पाटील कोथळीकर, विश्वजीत शिंदे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…