Home Uncategorized स्व.डॉ.आप्पासाहेब उर्फ सा. रे.पाटील सोशल फाउंडेशनचे पुरस्कार जाहिर…डॉ.राजेंद्रसिंह राणा, भास्करराव पेरे-पाटील , पै अमृता पुजारी यांना पुरस्कार जाहीर…

स्व.डॉ.आप्पासाहेब उर्फ सा. रे.पाटील सोशल फाउंडेशनचे पुरस्कार जाहिर…डॉ.राजेंद्रसिंह राणा, भास्करराव पेरे-पाटील , पै अमृता पुजारी यांना पुरस्कार जाहीर…

7 second read
0
0
135

 शिरोळ : शिरोळ तालुक्याचे माजी आमदार व श्री दत्त साखर कारखान्याचे संस्थापक संचालक स्व डॉ.आप्पासाहेब ऊर्फ सा.रे.पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त १ एप्रिल रोजी विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

यावर्षीच्या स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील समाजभुषण पुरस्कारासाठी जलतज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा, समाजकार्य पुरस्कारासाठी ग्राम विकास क्षेत्रातील नेतृत्व भास्करराव पेरे-पाटील तसेच क्रीडा क्षेत्रातील युवा प्रेरणा पुरस्कारासाठी महाराष्ट्र केसरी पै. अमृता पुजारी यांची निवड करण्यात आली आहे.

पुरस्कार वितरण समारंभ १ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता शिरोळ-श्री दत्त कारखाना कार्यस्थळावरील कै. दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळाच्या मैदानावर होईल अशी माहिती पुरस्कार निवड समितीचे प्रमुख विनोद शिरसाठ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.        

दरम्यान , स्व. सा.रे.पाटील स्मृती पुरस्कार वितरण समारंभासाठी राज्य व राष्ट्रीय पातळीवरील मान्यवरांना निमंत्रित करण्यात येणार असून या समारंभास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी केले आहे.     

ते म्हणाले , स्व. यशवंतरावजी चव्हाण यांनी समृध्द आणि संपन महाराष्ट्राच्या उभारणीकरता सहकार-कृषी-औद्योगिक समाज रचनेचे स्वप्न पाहिले. त्यांच्या स्वप्नांचा ध्यास घेवून सहकार महर्षी स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांनी शिरोळ तालुका परिसरात सहकारी संस्थाच्या माध्यमातून समृध्दीची बीजे रोवली.

स्व सा रे. पाटील यांनी आयुष्यातील ६० वर्षाहून अधिक काळ सहकार व सामाजिक क्षेत्रात खर्ची घातले आहेत. सा रे पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रत्येक वर्षी जिल्हा , राज्य व राष्ट्रीय पातळीवरील आदर्शवत व्यक्तींना कोल्हापुरी फेटा , सन्मानचिन्ह , सन्मानपत्र व रोख रक्कम देऊन पुरस्काराने गौरविण्यात येते. पुरस्काराचे हे ९ वे वर्षे असून पुरस्कार निवड समितीने यावर्षीचे पुरस्कार जाहीर केले.    

चेअरमन पाटील म्हणाले, सा रे पाटील सोशल फाउंडेशन च्या वतीने यापूर्वी ज्येष्ठ पुरोगामी नेते स्व.एन.डी.पाटील , स्व. आमदार गणपतराव देशमुख , जेष्ठ तत्वनिष्ठ राजकारणी माजी मंत्री स्व. बी. जे. खताळ -पाटील , पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील , श्रीमती चेतना गाला-सिन्हा , कृषी क्षेत्रातील तज्ञ अशोक बंग , माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्र पवार , भारतीय पोलीस सेवेतील निवृत अधिकारी मिरा बोरवणकर तसेच गत वर्षी डॉ. सुधिर भोंगळे , राही सरनोबत या मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.    

या पत्रकार बैठकीस दत कारखान्याचे कार्यकारी संचालकी एम व्ही पाटील , शेखर पाटील , पृथ्वीराज यादव , दामोदर सुतार, दरगु गावडे ,अशोकराव कोळेकर , महेंद्र बागी , मिनाज जमादार , हसन देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…