Home Uncategorized आचार्यश्री विद्यासागर महाराज यांच्या प्रथम समाधी स्मृती महामहोत्सवाची सांगता

आचार्यश्री विद्यासागर महाराज यांच्या प्रथम समाधी स्मृती महामहोत्सवाची सांगता

4 second read
0
0
91

जयसिंगपूर : प्रतिनिधी
समाज प्रबोधनासाठी आचार्यश्री विद्यासागर महाराज यांनी केलेल्या योगदानाचा जागर करत येथे आज आचार्य श्री १०८ विद्यासागरजी महामुनीराज यांच्या प्रथम समाधी स्मृती महामहोत्सव सोहळा साजरा केला. हजारो श्रावक-श्राविकांच्या उपस्थितीत विद्यासागरजी महामुनीराज यांच्या जीवनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकत विविध मुनीनी आपल्या प्रवचनातून त्यांच्या कार्याला उजाळा दिला. समारंभाच्या निमित्ताने शहराने अनोखा उत्साह अनुभवला.

दोन फेब्रुवारीपासून महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम सुरु होते. आज महोत्सवाचा मुख्य सोहळा झाला.प.पू. अध्यात्म शिरोमणी आचार्य श्री १०८ समयसागरजी महाराज, प.पू.आचार्य श्री १०८ वर्धमान सागरजी महाराज, प. पू.१०८ चंद्रप्रभसागरजी महाराज, प. पू. मुनीश्री १०८ उत्तमसागरजी महाराज, प. पू. मुनीश्री १०८ कुंथूसागरजी महाराज, प. पू. मुनीश्री १०८ विशालसागरजी महाराज, प. पू. मुनीश्री १०८ धवलसागरजी महाराज, प. पू. मुनीश्री १०८ विदेहसागरजी महाराज, प. पू. मुनीश्री १०८ उत्कृष्ट सागरजी महाराज, प.पू. मुनीश्री १०८ नमीतसागरजी महाराज, प.पू. मुनीश्री १०८ भास्वतसागरजी महाराज, प.पू. मुनीश्री १०८ निर्लोभसागरजी महाराज, प.पू. मुनीश्री १०८ श्रुतसागरजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रम झाले. सहभागी मुनींनी विद्यासागर महाराजांच्या सानिध्यातील अनुभव सांगितले. केवळ जैन समाजच नव्हे तर विश्वाला शांततेचा समतेचा, संयमाचा संदेश देणाऱ्या विद्यासागर महाराजांचे जीवनचरित्रच यावेळी मांडण्यात आले. यावेळी त्यांच्या अनेक स्वभाव वैशिष्ठ्यावर चर्चा करत त्यांच्या कार्याची महती सांगण्यात आली.


सकाळी साडेसात वाजता अभिषेक, शांतीधारा पूजन व ध्वजारोहण, रक्तदान शिबिर संपन्न झाले. तर सकाळी अकरा वाजता भव्य विद्या ग्रुप स्मृतिप्रभावना फेरी झाली यानंतर मुख्य कार्यक्रमाला दुपारी एक वाजता सुरुवात झाली.कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांची उपस्थिती होती. स्वागत स्वरूपा पाटील यड्रावकर यांनी केले प्रास्ताविक बा.ब्र. तात्याभैय्या यांनी केले. यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, गौरवाध्यक्ष राजू शेट्टी, माजी मंत्री प्रकाश आवाडे, अरिहंतचे उत्तम पाटील, सतिश हजारे, सुशिला पाटील, चंद्रकांत देसाई, रावसाहेब पाटील, पोलिस निरीक्षक सत्यवान हाके, अभयकुमार बरगाले उपस्थित होते.

फोटो-जयसिंगपूर: आचार्यश्री विद्यासागर महाराजांच्या कार्याची माहिती देताना प. पू. मुनीश्री १०८ विशालसागरजी महाराज.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…