Home Uncategorized आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची शिवनाकवाडीला भेट ; प्रशासनाला त्वरित उपाययोजनांचे दिले आदेश

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची शिवनाकवाडीला भेट ; प्रशासनाला त्वरित उपाययोजनांचे दिले आदेश

3 second read
0
0
61

जयसिंगपूर : प्रतिनिधी
शिवनाकवाडी येथे झालेल्या मोठ्या विषबाधेच्या घटनेनंतर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी तातडीने शिवनाकवाडी गावाला भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. गंभीर परिस्थितीची पाहणी करत त्यांनी आरोग्य विभाग व प्रशासनाला त्वरित उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांनी रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या तब्येतीची माहिती घेतली आणि योग्य उपचार दिले जात आहेत की नाही, याबाबत डॉक्टरांशी चर्चा केली. रुग्णालयांमध्ये आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, कोणत्याही रुग्णास औषध किंवा उपचाराअभावी त्रास होऊ नये, असे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.


आरोग्य विभागाने विषबाधेचे मूळ कारण शोधण्यासाठी तपास जलदगतीने करावा अशा सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी, अनिरुद्ध पिंपळकर, तालुका आरोग्य अधिकारी पांडुरंग खटावकर, आयजीएम रुग्णालयाचे डॉ. बागवान, तहसीलदार अनिल कुमार हेळकर, गटविकास अधिकारी नारायण घोलप यांना केल्या.

दरम्यान इतर घटनेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग गतिमान झाला असून, सुमारे ५०० कर्मचाऱ्यांचे पथक गावातील घरोघरी जाऊन तपासणी करत आहे. यात्रेतील अन्नपदार्थ व पाणी यांची तपासणी सुरू असून, अन्न व औषध प्रशासन विभागानेही संपूर्ण परिसरातील खाद्यपदार्थांचे नमुने घेतले आहेत. आ. यड्रावकर यांनी गंभीर रुग्णांना तातडीने मोठ्या रुग्णालयात हलविण्याच्या सूचना दिल्या असून, गरज असल्यास आणखी वैद्यकीय पथके तैनात करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांना दिले आहे. दरम्यान सध्याची स्थिती नियंत्रणाखाली आहे तरीही प्रशासनाने सतर्क राहून रुग्णांची काळजी घेण्याची आवाहन आमदार यड्रावकर यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…