Home Uncategorized पोलीस दलातील चमकदार कामगिरीमुळे रविराज फडणीस यांचा जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून गौरव

पोलीस दलातील चमकदार कामगिरीमुळे रविराज फडणीस यांचा जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून गौरव

3 second read
0
0
90

शिरोळ : प्रतिनिधी

कुरुंदवाड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांना सन 2024 मध्ये प्रभावी कामगिरी केल्याबद्दल कोल्हापूर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्ह्यांची उकल करण्यासाठी त्यांनी दाखवलेली कार्यक्षमता वाखाणण्याजोगी ठरली आहे. रविराज फडणीस यांनी 2024 मध्ये एकूण 436 नोंदवलेल्या गुन्ह्यांपैकी तब्बल 413 गुन्ह्यांची उकल करत 95 टक्के गुन्हे उघडकीस आणले. या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कठीण गुन्ह्यांची उकल करण्यासाठी अतिशय प्रभावी पद्धतींचा वापर केला.

या कामगिरीची दखल घेत जिल्हा पोलिस प्रमुख महेंद्र पंडित यांच्या हस्ते विशेष पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात पोलिस अधीक्षकांनी फडणीस यांच्या कौशल्याचे आणि मेहनतीचे कौतुक केले. त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वामुळे कुरुंदवाड परिसरात कायदा व सुव्यवस्था अधिक दृढ झाली असल्याचे अधीक्षकांनी नमूद केले. पोलिस निरीक्षक फडणीस यांनी हा पुरस्कार स्वीकारताना आपल्या यशाचे श्रेय संपूर्ण पथकाला दिले. त्यांनी सांगितले की, गुन्हेगारांना न्यायापर्यंत पोहोचवणे हे पोलिस दलाचे कर्तव्य असून या यशाने त्यांचे आणि त्यांच्या पथकाचे मनोबल उंचावले आहे.

फडणीस यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे पोलिस विभागात एक नवा मापदंड प्रस्थापित झाला आहे. त्यांच्या प्रेरणादायी कार्यामुळे पोलिस दलातील अन्य कर्मचाऱ्यांनाही उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रोत्साहन मिळाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…