Home Uncategorized शिरोळ तालुक्यातील ८१ स्टोन क्रशर तहसील विभागाने केले सील

शिरोळ तालुक्यातील ८१ स्टोन क्रशर तहसील विभागाने केले सील

3 second read
0
0
90

शिरोळ : प्रतिनिधी

शिरोळ तालुक्यात असलेल्या स्टोन क्रशर धारकांनी २०२५ सालाकरिता अधिकृत विक्रेता परवाना घेतला नसल्याने शिरोळ तहसिलदार अनिलकुमार हेळकर यांच्या आदेशानुसार शुक्रवारी स्टोन क्रशर सील करण्यात आले. मंडल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी व ग्राम महसुल अधिकारी यांच्या संयुक्त १० पथकाने शुक्रवारी दिवसभरात ही कारवाई केली. मात्र दुसरीकडे गेल्या २० दिवसापासून क्रशर बंद असल्याने सर्व क्रशरधारकांनी तहसिल कार्यालय गाठून आपले म्हणणे मांडले.


याबाबत अधिक माहिती अशी, गेल्या दोन दिवसापूर्वी हातकणंगले तालुक्यात विनापरवाना सुरू असलेले हे क्रशर सील करण्याच्या कारवाया करण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यात गौण खनिज व्यावसायिकांमध्ये स्टोन क्रशरधारक, सिलिका सॅण्ड, खडी, क्रशान डस्ट वाळू, दगड, मुरुम, जांभा यासह लागणारे साहित्य २०२५ या वर्षाकरिता अधिकृत विक्रेता परवानगी न घेतलेल्या तब्बल ८१ जणांचे स्टोन क्रशर शुक्रवारी सीलबंद करण्यात आले. या कारवाई पथकात मंडल अधिकारी मच्छिंद्र कुंभार, अविनाश सुर्यवंशी, संतोष पाटील, अमित पाडळकर, नितीन कांबळे यांच्यासह तलाठी सदाशिव निकम, गणेश आवळे, महेश नागरगोजे, आरती चौगुले, सीमा धोत्रे, संपदा कारंडे, अर्पणा तारळेकर, अश्विनी पाटील आर्दिच्या १० जणांच्या पथकाकडून जयसिंगपूर, धरणगुत्ती, नांदणी, चिपरी, जांभळी, दानोळी, संभाजीपूर आदी ८१ स्टोन क्रशर सील करण्यात आले.

दरम्यान, गेल्या २० दिवसापासून दगड उपलब्ध नसल्याने शिरोळ तालुक्यातील क्रशर बंद आहेत. अशा परिस्थितीत विक्री परवाना नसल्याच्या कारणावरून शुक्रवारी शिरोळ महसूल विभागाने केलेल्या कारवाईमुळे क्रशर व्यवसायामध्ये खळबळ उडाली आहे. शुक्रवारच्या कारवाईनंतर अनेक क्रशर मालकांनी शिरोळ तहसिल कार्यालय गाठून आपले परवाने काढण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर प्रशासनासमोर आपले म्हणणेही मांडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

जयसिंगपूर : कुणाल कांबळे जयसिंगपूर येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि क्रिकेट या खेळातील एक ज…