
राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान खेबवडे यांच्या वतीने आयोजित प्रकट वाचन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.
राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान खेबवडे यांच्या वतीने घेतलेल्या प्रकट वाचन स्पर्धेत विद्या मंदिर बाचणीची विद्यार्थिनी कु. अहिल्या शिवाजी पाटील हिने प्रथम क्रमांक मिळवला..
विद्या मंदिर बाचणी ची विद्यार्थिनी कु. परी सचिन पाटील हिने द्वितीय तर खेबवडे हायस्कूल ची विद्यार्थिनी कु.नम्रता विश्वास चौगले हिने तृतीय क्रमांक मिळवला.
या स्पर्धेमध्ये विद्या मंदिर खेबवडे, खेबवडे हायस्कूल, न्यू हायस्कूल बाचणी, विद्या मंदिर बाचणी, विद्या मंदिर बामणी, विद्या मंदिर केंबळी इथल्या वीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
यानिमित्ताने राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री शिवाजीराव पाटील, उप- जिल्हाधिकारी श्री. पांडुरंग मगदूम साहेब, निवृत्त एक्साईज ऑफिसर श्री. डी. वाय. पाटील , निवृत्त सुभेदार श्री प्रताप मगदूम, श्री विजय पाटील, श्री आनंदा पाटील आदी उपस्थित होते..
या स्पर्धेचं परीक्षण श्री. व्ही. आर. सडोलकर सर आणि श्री. कुंभार सार यांनी केलं.
परिसरातील शाळांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. असेच उपक्रम राबवण्यासाठी राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान नेहमी आग्रही असेल असे मत श्री डी. वाय. पाटील यांनी व्यक्त केलं. श्री पवार सर यांनी आभार व्यक्त केले.


