मलकापूर प्रतिनिधी:
जुने पारगाव ता. हातकणंगले येथे डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय, तळसंदे यांच्यातर्फे ग्रामीण कृषी जागरुकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम नुकताच घेण्यात अपला. ह्या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना शेती विषयी विविध विषयांवर प्रत्यक्षीक सादर करून दाखवण्यात आली.
कार्यकमास सरंपच तुकाराम पवार, श्री पाराश विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा संस्थाचे चेअरमन बाबासो मोरे आदीसह गग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डी.एन. शेलार, अकॅडमीक इनचार्ज आर. आर. पाटील, कृषीविस्तार समन्वयक डॉ एस. एम. घोलपे, शांचे मार्गदर्शन लाभले. नियोजन कृषी कन्या – समृद्धी पाटील, वेदिका देसाई, सानिका धुमाळ, पल्लवी भिंगे, लतिका कांबळे, सृष्टी गुंडणके, स्नेहल जाधक यांनी केले.