Home Uncategorized परिवर्तनासाठी गणपतराव पाटलांना निवडून द्या : शरद पवार यांचे आवाहन

परिवर्तनासाठी गणपतराव पाटलांना निवडून द्या : शरद पवार यांचे आवाहन

3 second read
0
0
34

शिरोळ : प्रतिनिधी

शेतकरी, लाडक्या बहिणी व बेरोजगारांची घोर निराशा झाली असल्याने, राज्यांमध्ये परिवर्तनाची लाट आहे. या परिवर्तनाच्या लाटेमध्ये शिरोळ विधानसभा मतदारसंघातून गणपतराव पाटील यांना निवडून द्या असे आवाहन प्रसारमाध्यमांशी बोलताना शरदचंद्र पवार यांनी केले.

प्रसार माध्यमांशी बोलताना शरदचंद्र पवार म्हणाले,देशामध्ये काही मोजकेच सहकारी साखर कारखाने उत्तम रीतीने चालले आहेत यामध्ये शिरोळ येथील श्री दत्त साखर कारखान्याचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे शिरोळ विधानसभा मतदारसंघातील उमेदवार गणपतराव आप्पासाहेब पाटील यांनी गेली दहा वर्ष उत्तम रीतीने साखर कारखाना चालवताना कामगार कष्टकरी मजूर व शेतकरी यांच्या प्रगती करता मोठे योगदान दिले आहे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीकरता मोठे काम केले आहे यामुळे शिरोळ विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी आपली जबाबदारी पार पाडून श्री गणपतराव पाटील यांना निवडून देऊन परिवर्तन घडवा, असा थेट संदेश शिरोळ तालुक्यातील मतदारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार यांनी दिला.


यामुळे तालुक्यातील सर्व सांगोपांगी अफवांचे निराकरण झाल्याने कार्यकर्त्यांना अधिकचे पाठबळ मिळालेले असून कार्यकर्ते जोमाने कामाला लागत आहेत. दरम्यान याबाबत बोलताना गणपतराव पाटील म्हणाले आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा आशीर्वाद मला याही पूर्वी होता त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी साखर कारखानदारी तसेच शेती शेती विषयक नवीन नवीन प्रयोग व समाजकारण केले आहे त्यांच्या मार्गदर्शन आणि पाठबळावरती शिरोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनता,शेतकरी, मजूर,कामगार, महिला, मला मताच्या रूपाने आशीर्वाद देतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

जयसिंगपूर : कुणाल कांबळे जयसिंगपूर येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि क्रिकेट या खेळातील एक ज…