Home Uncategorized लाटगांव येथिल दलित समाजाचा ए वाय पाटील यांना पाठिंबा….

लाटगांव येथिल दलित समाजाचा ए वाय पाटील यांना पाठिंबा….

5 second read
0
0
19

आजरा/प्रतिनिधी

आजी-माजी आमदारांनी गेल्या वीस वर्षात दलित समाजाची फक्त पोकळ आश्वासने देऊन तोंडाला पाने पुसण्याचे काम केले असून अजूनही या समाजात बेरोजगारी,उच्च शिक्षण,रस्ते,वीज ,पाणी या मुलभूत सोयीसुविधांची वाणवा असून प्रस्थापित राजकारण्यांनी निवडणुकीवेळी फक्त वेगवेगळी अमिषे दाखवून आमच्या समाजाला मागासच ठेवले आहे. त्यामुळे जनतेचा प्रश्नांची जाण असणार्या व मागासवर्गीय माणसांना विविध पदे देऊन मोठे करणार्या ए वाय पाटील यांना आमचा समाजाचा पूर्ण पाठींबा आहे असे प्रतिपादन भरत कांबळे यांनी लाटगांव ता आजरा येथे पाठिंबा सभेत बोलताना केले कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी पांडुरंग देसाई हे होते. याप्रसंगी मसणू कांबळे, धोंडीबा कांबळे, महादेव कांबळे, आप्पा कांबळे, दत्तू कांबळे, मारुती कांबळे, विष्णू कांबळे, बाबु कांबळे, शंकर कांबळे, पांडुरंग कांबळे उपस्थित होते. यावेळी ए वाय पाटील म्हणाले आजरा संपर्क प्रचारदौर्यात मला येथिल खेडे,हाजगोळी,मुंगुसवाडी,चांदेवाडी,सुळगांव,साळगाव,पेरणोली,हारपवडे,कोरीवडे,देवकांडगाव,विनायकवाडी,मेढेवाडी,दाभिल,शेळप,खेडगे,पारपोली,गवसे,दर्डेवाडी या गावातील मतदारांनी भरभरुन प्रतिसाद दिला व लाटगावचा दलित जनतेने मला या निवडणूकीत पाठिंबा देऊन हत्तीचे बळ दिले.त्यामुळे भविष्यात त्यांचा माझ्यावरील विश्वासास तडा जाऊ दिला जाणार नाही. यावेळी पांडुरंग दोरुगडे, दिपक लोखंडे, युवराज कांबळे, रामराव जाधव,शंकर हाळवणकर, संजय हाळवणकर, चंद्रशेखर देसाई हेमंत चव्हाण व कार्यकर्ते उपस्थित होते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…