Home Uncategorized कामाच्या जोरावर ऋतुराज यांचा विजय निश्चित : आ.सतेज पाटील

कामाच्या जोरावर ऋतुराज यांचा विजय निश्चित : आ.सतेज पाटील

4 second read
0
0
33

कोल्हापूर, : आमदार ऋतुराज पाटील यांनी पाच वर्षाच्या आपल्या आमदारकीच्या काळात दक्षिण मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलला. मतदारसंघात केलेल्या विकासकामाच्या जोरावर त्यांचा विजय निश्चित आहे असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले. आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ जवाहरनगर परिसरातील नागरीकांशी त्यांनी संवाद साधला.
आमदार सतेज पाटील म्हणाले, जनतेचे प्रेम आणि कार्यकर्त्यांच्या जीवावर मी आजपर्यंत यश मिळवले आहे. पैसा, प्रतिष्ठा यापेक्षा सुखदु:खात आपल्यासारखी माणसे कमवली हा मोठा आनंद आहे. आमदार ऋतुराज पाटील यांनी मतदारसंघात नवनवीन संकल्पना यशस्वीपणे राबवल्या आहेत.
माजी उपमहापौर हरिदास सोनवणे म्हणाले, आमदार ऋतुराज पाटील व आमदार सतेज पाटील यांनी वीर कक्कया समाजाचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. आमदार ऋतुराज पाटील यांच्या रूपाने एक तरुण तडफदार आमदार आपल्याला मिळाला आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करण्याची आमदार ऋतुराज पाटील यांची कार्यपध्दती आहे. आमदार ऋतुराज पाटील यांना मताधिक्य देऊया.
माजी उपमहापौर भूपाल शेटे म्हणाले, आमदार ऋतुराज पाटील यांनी उपनगरांच्या विकासासाठी भरीव निधी दिला आहे. त्यांनी विकासकामांचा डोंगर उभा केल्याने ते सर्वाधिक मतांनी निवडून येतील.
वीरशैव कक्कया समाजाचे अध्यक्ष शिवाजी पोळ यांनी, वीरकक्कया समाज आमदार ऋतुराज पाटील, यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील असे सांगीतले.
निरंजन कदम म्हणाले, दक्षिणच्या मैदानात आमदार ऋतुराज पाटील विक्रमी मतांनी विजयी होऊन बाजी मारतील.
यावेळी राजू साबळे, तुळसीदास व्हटकर, फिरोज सौदागर, धोंडीराम व्हटकर, रविंद्र व्हटकर, राजु आवळे, जगमोहन भुर्के, यांच्यासह जवाहरनगर, सुभाषनगर प्रभागातील नागरिक, वीर कक्कया समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…