Home Uncategorized विकास कामाची गंगा सुरूच ठेवण्याकरिता आपण सर्वांनी साथ द्यावी : संजय पाटील यड्रावकर

विकास कामाची गंगा सुरूच ठेवण्याकरिता आपण सर्वांनी साथ द्यावी : संजय पाटील यड्रावकर

4 second read
0
0
24

शिरोळ : प्रतिनिधी
जयसिंगपूर शहराच्या विकासाचा आलेख कायम उंचावत ठेवण्याकरिता राजश्री शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांना पुन्हा एकदा प्रचंड मतांनी निवडून देणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. गत पाच वर्षात सर्व जाती व धर्मांच्या मंदिरे सुशोभीकरण, सांस्कृतिक भवन, गटारी, रस्ते, दिवाबत्ती याकरिता मोठा निधी देण्यात आला आहे. यापुढील ही विकास कामाची गंगा सुरूच ठेवण्याकरिता आपण सर्वांनी साथ द्यावी. असे मत माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केले. महायुती व राजश्री शाहू विकास आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचारार्थ शाहूनगर भागातील समडोळे मळा, पटेल चौक, महालक्ष्मी चौक, रामनगर भागात प्रचार फेरी काढण्यात आली. या वेळी ते बोलत होते. यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीला परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिरात माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्यासह भाजप, शिवसेना पदाधिकारी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

यावेळी माजी नगराध्यक्ष असलम फरास, अर्जुन देशमुख, शितल गतारे, महेश कलगुटगी, राजू आडके, रामदास धनवडे, रमेश कलगुटगी गंगाराम माने, अशोक भोसले, मारुती नलवडे, वसंत पवार, आकाश शिंगाडे, संतोष भोसले, सखाराम नलवडे, तुकाराम साळुंखे, भीमराव गाडीवडर, रेखा देशमुख, प्रेमला मुरगुंडे, अनुराधा आडके, रूपाली कलगूटगी, शिवसेना वैद्यकीय विभागाचे तालुकाप्रमुख सचिन डोंगरे, तालुका उपप्रमुख सुरज भोसले, अर्चना भोजने, शैलेश आडके, सागर मादनाईक भाजपाचे अनिल सुतार, राजू निर्मळे, ऋतुराज पाटील, संजय शिसोदे यांच्यासह शाहूनगर भागातील नागरिक मतदार लोकप्रतिनिधी व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

फोटो ओळ- जयसिंगपूर येथील शाहूनगर विभागात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचारार्थ निघालेली रॅलीमध्ये सहभागी कार्यकर्ते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…