Home Uncategorized मंडलिक गट आणि मुश्रीफ गट हे एकच कुटुंब

मंडलिक गट आणि मुश्रीफ गट हे एकच कुटुंब

6 second read
0
0
59

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना एक लाखाहून अधिक मताधिक्याने निवडून आणून विरोधी उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करू, असा इशारा माजी खासदार संजयदादा मंडलिक यांनी दिला. मंडलिक गटाच्यावतीने आयोजित भगवा मेळाव्याला जोरदार प्रतिसाद मिळाला. मंडलिक गट आणि मुश्रीफ गट हे एकच कुटुंब असून आमचं आता मनापासून जुळलय. कुटुंबातील वाद आता मिटलाय, असेही ते म्हणाले.

भाषणात प्रा. मंडलिक पुढे म्हणाले, यापूर्वी जे झालं ते झालं. यापुढे आपल्याला एकाच मार्गाने जायचे आहे. महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी संपूर्ण जिल्हाभर लक्ष द्यावे, त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आमची. श्री. मुश्रीफ यांना पाठिंबा कसला आम्ही तर घरचेच आहोत. स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी जात-पातीच्या पलीकडे रुजविलेल्या पुरोगामीत्वामुळे श्री. मुश्रीफ सातत्याने निवडून येतात. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार सत्तेवर येण्यासाठी जिल्ह्यातील महायुतीच्या सर्वच उमेदवारांना विजयी करा, असे आवाहनही त्यांनी केले.

पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, मंडलिक व मुश्रीफ हे एकच कुटुंब आहे. आपल्यातील समज- गैरसमज गंगार्पण करूया. स्व. खासदार कै. सदाशिवराव मंडलिक यांच्यामुळेच माझी राजकीय आणि सामाजिक जडणघडण झाली. निर्भीडपणा, धाडस, रोखठोक करारीपणा आणि स्वाभिमान हे गुण त्यांच्याकडून आले. स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या पाऊलखुणांवरूनच माझ्या संपूर्ण आयुष्याची वाटचाल सुरू आहे. यापुढेही प्रा. संजयदादा मंडलिक व माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्या सोबतीने जिल्हा समृद्ध करू. जय- पराजयाची पर्वा न करता लढणं हीच स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांची शिकवण आहे. प्रा. संजय मंडलिक यांनी एखाद्या पराभवाने खचून जाऊ नये, त्यांना पुढच्या लोकसभेत खासदार म्हणून निवडून आणणे ही जबाबदारी आमची आहे. ॲड. वीरेंद्र मंडलिक यांचे राजकीय स्वप्न, सामाजिक जीवनातील इच्छा -आकांक्षा यांचा बॅकलॉग भरून काढू.

ॲड. विरेंद्र मंडलिक म्हणाले, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना एक लाखाहून अधिक मताधिक्याने निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करू. विकासाचं आणि विचारांचे राजकारण झालं पाहिजे, ही स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांची विचारधारा होती. त्यामुळेच मी या निवडणुकीतून थांबलो आहे.

कार्यक्रमात जयसिंग भोसले, विजय काळे, अनिल सिद्धेश्वर, प्रदीप चव्हाण, श्रीकांत भोसले, भगवान पाटील, राणाप्रताप सासणे, जीवनराव साळोखे यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी गोकुळचे संचालक युवराज पाटील, केडीसीसीचे संचालक प्रताप उर्फ भैयासाहेब माने, आर डी पाटील – कुरुकलीकर, केशवकाका पाटील, माजी जि प सदस्या सौ. शिवानीताई भोसले, आनंदराव फराकटे, एन एस चौगुले, रामचंद्र सांगले, विश्वास कुराडे, शहाजी यादव, आप्पासाहेब तांबेकर, नंदकुमार पाटील, बाजार समितीचे संचालक बी. जी. पाटील, नामदेवराव मेंडके, दत्तात्रय मंडलिक आदीप्रमुख उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…