Home Uncategorized चिखलीत समरजीत घाटगे गटाला राम राम ठोकून असंख्य कार्यकर्ते मुश्रीफ गटात…

चिखलीत समरजीत घाटगे गटाला राम राम ठोकून असंख्य कार्यकर्ते मुश्रीफ गटात…

2 second read
0
0
83

चिखली ता. कागल येथील समरजीत घाटगे गटातील प्रमुख कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये जाहीर प्रवेश..

नानीबाई चिखली, ता. कागल येथील सागर कृष्णात पाटील (सोयाबीन व्यापारी चिखली), कृष्णा शंकर पाटील, आण्णासो शंकर पाटील, शितल सागर पाटील, युवराज महादेव पाटील, नितीन नारायण मगदूम यांच्यासह प्रमुख कार्यकत्यांनी पालकमंत्री नामदार हसनसो मुश्रीफसाहेब यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गटाचे स्कार्प गळ्यात घालून पक्षात स्वागत केले.

यावेळी पालकमंत्री नामदार हसनसो मुश्रीफसाहेब म्हणाले, चिखलीतील सागर पाटील यांच्यासारख्या प्रमूख कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकटी देणारा आहे. कार्यकर्त्यांनी ज्या विश्वासाच्या भावनेने पक्षप्रवेश केला आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. जनतेच्या प्रश्नांसाठी मध्यरात्रीसुद्धा हाकेला ओ देऊन मी या सर्वांच्या पाठीशी हिमालयासारखा उभा राहीन.

यावेळी उपस्थित नावे सदाशिव तुकान, बशीर नदाफ, धीरज मगदूम, बाजीराव वाडकर, अब्बास जमादार, राजू चौगुले, बाळू घस्ती, बाबुराव वाडकर, गैबी नाईक, रहिम जमादार, वाशीम सय्यद,अमोल चौगुले, रोहित हवालदार, हकीम आणुरे, संतोष कोगनुळे, रमेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…