Home Uncategorized मलकापूर मध्ये साकारली करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई नवरात्रातील प्रथम दिवशी केलेल्या रूपाची प्रतिकृती

मलकापूर मध्ये साकारली करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई नवरात्रातील प्रथम दिवशी केलेल्या रूपाची प्रतिकृती

4 second read
0
0
21

श्रीसूक्तवर्णित सकलवैभवसह श्रीमहालक्ष्मी शारदीय नवरात्रात श्रीअंबाबाईची श्रीसूक्तामध्ये वर्णन केलेल्या श्री अर्थात महालक्ष्मीस्वरूपात बैठी पूजा बांधली आहे. श्रीसूक्तातील श्रीमहालक्ष्मी ही आदिजननी आहे. तीने आपल्या तपोबळावर बिल्ववृक्ष निर्माण केला ज्याची फळे तिला प्रिय आहेत. तीने सृष्टी निर्माण केली. तीने सर्वांना धन, धान्य, पशु, पुत्र, कन्या, भरपूर प्रमाणात पाणी, शेणखत, फळे, फुले, निर्मितीची, सृजनाची क्षमता असं सर्वकाही दिलं. श्रीसूक्तामधील श्रीमहालक्ष्मी ही हत्ती, घोडे, गाई यांसारख्या पशुंच्या सान्निध्याने प्रफुल्लित होते. तिचे आनंद, कर्दम, श्रीद आणि चिक्लीत असे पुत्रवत् ऋषि सदैव तिच्या सेवेत असतात.

॥करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई नवरात्रात प्रथम दिवशी केलेल्या रूपाची प्रतिकृती ॥

सिद्धनाथ तरुण मंडळ ब्रह्मपुरी (भट गल्ली) मलकापूर येथे गेली २० वार्षा पासून ही प्रथा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जुने पारगाव येथे ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्‌योगिक कार्यक्रमासाठी कृषीकन्या सज्ज

मलकापूर प्रतिनिधी: जुने पारगाव ता. हातकणंगले येथे डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय, तळस…