Home Uncategorized आसुर्ले येथील कै. भगवानराव सरनोबत यांच्या स्मारकाचे भूमिपूजन आमदार कोरे यांनी केले

आसुर्ले येथील कै. भगवानराव सरनोबत यांच्या स्मारकाचे भूमिपूजन आमदार कोरे यांनी केले

2 second read
0
0
154

आसुर्ले (ता.पन्हाळा) येथे कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष व श्री केदारलिंग वारणा सहकारी सुतगिरणीचे संस्थापक कै.भगवानराव बळवंतराव सरनोबत (सरकार) यांच्या स्मारकाचे भूमिपूजन आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या हस्ते करण्यात आले. कै.भगवानराव बळवंतराव सरनोबत (सरकार) यांनी केलेल्या विकासकामांचा व समाजसेवेच्या स्मृती कायम आठवणीत राहाव्यात म्हणून श्री केदारलिंग वारणा सहकारी सुतगिरणीच्या पटांगणात त्यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे.त्या स्मारकाचे भूमिपूजन आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या हस्ते करण्यात आले.

तसेच श्री केदारलिंग वारणा सहकारी सुतगिरणीचे उर्वरित काम येत्या २ ते ३ महिन्यांत पूर्णत्वास जाऊन कै.भगवानराव बळवंतराव सरनोबत (सरकार) यांचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी सांगितले.

यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक अमरसिंह पाटील (भाऊ),कर्णसिंह गायकवाड (सरकार),हातकणंगले विधानसभेचे नेते अशोकराव माने (बापू),करवीर विधानसभेचे नेते संताजी बाबा घोरपडे, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील (पेरीडकर),पन्हाळा पंचायत समिती माजी सभापती पृथ्वीराज सरनोबत यांच्यासह श्री केदारलिंग वारणा सहकारी सुतगिरणीचे सर्व संचालक व जनसुराज्य शक्तीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

मलकापूर–येळवण जुगाई रोडवरील पनुंद्रे फाटा येथे समोरून येणाऱ्या चारचाकी गाडीची धडक बसून साग…