Home Uncategorized पन्हाळा नगरपालिकेच्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन च्या ठिकाणी आमदार कोरे यांची भेट

पन्हाळा नगरपालिकेच्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन च्या ठिकाणी आमदार कोरे यांची भेट

3 second read
0
0
113

पन्हाळा येथे पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेच्या वतीने व मराठा लष्करी स्थापत्य श्रृंखला अंतर्गत “किल्ले पन्हाळा” चे जागतिक वारसा स्थळ नामांकन च्या अनुषंगाने भव्य राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी प्रत्येक ठिकाणी स्पर्धकांशी जाऊन संवाद साधला.

पन्हाळा किल्ल्याला जागतिक वारसा नामांकन मिळविताना किल्ल्यांसह भोवतालच्या परिसराबाबत आत्मीयता वाढावी, यासाठी आता लोकसहभाग घेण्याचा निर्णय पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेने घेतला आहे. तसेच किल्ल्यांसंदर्भात चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातून ३५० हून अधिक स्पर्धेकांनी सहभाग घेतला होता.

पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेच्या वतीने पुढच्यावेळी घेण्यात येणारी स्पर्धा आपण देशपातळीवर भरवू तसेच महाराष्ट्रासह देशभरातून येणाऱ्या सर्व स्पर्धकांची राहायची सोय करू तसेच अशा स्पर्धा व्हायला पाहिजेत तरच कलाकारांना त्यांच्या कलेची दाद मिळेल असे मत आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी व्यक्त केले.

यावेळी माजी नगराध्यक्ष विजय पाटील,माजी नगराध्यक्षा रूपाली धडेल,माजी उपनगराध्यक्ष रविंद्र धडेल,चैतन्य भोसले,रवी तोरसे,दिनकर भोपळे,तेजस्विनी गुरव,माजी नगरसेवक अवधूत भोसले,बंडा पाटील,नियाज मुल्ला,अख्तर मुल्ला,राहुल भोसले,सचिन पाटील,राम गोसावी,पृथ्वीराज भोसले,नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चेतनकुमार माळी आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अभाविपचे आंदोलन

मलकापूर प्रतिनिधी: रोहित पास्ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्हापूर महानगर यांच्या वती…