Home Uncategorized शिरटी हायस्कूल,शिरटी विद्यालयात निर्भया पथक मार्गदर्शन सत्राचे आयोजन

शिरटी हायस्कूल,शिरटी विद्यालयात निर्भया पथक मार्गदर्शन सत्राचे आयोजन

5 second read
0
0
40

श्री ज्ञानदीप शिक्षण संस्था संचलित शिरटी हायस्कूल शिरटी विद्यालयात, आज शुक्रवार 20 सप्टेंबर 2024 रोजी निर्भया पथक शिरोळ पोलिस ठाणे येथे कार्यरत पोलिस उपनिरीक्षक विद्या राऊत मॅडम यांच्या मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोडे एस. ए. यांनी केले. माननीय मुख्याध्यापक खवाटे ए. ओ.व सौ. पोतदार एस. एम. मॅडम यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. निर्भया पथक जयसिंगपूर चे प्रमुख प्रविण माने यांनी गुन्हेगारी प्रवृत्ती व वैयक्तिक सुरक्षा तसेच आपली भूमिका याबाबत मार्गदर्शन केले. आपल्या कुटुंबापासून समाजापर्यंत वर्तनाविषयी आपण कसे जागरूक असावे याची जाणीव मार्गदर्शनात करून दिली.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक विद्या राऊत पोलीस उपनिरीक्षक शिरोळ यांनी वैयक्तिक सुरक्षा , गुड टच व बॅड टच ,व्यसनमुक्ती, मोबाईलचा अतिरेक वापर,मुलींच्या विषयी चांगला दृष्टिकोन व मुलींच्या आरोग्याबाबत सविस्तर व सखोल मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमास निर्भया पथकातील इतर सहकारी कर्मचारी उपस्थित होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक खवाटे ए. ओ.सर, सर्व अध्यापक- अध्यापिका, अध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या शेवटी निर्भया पथकाचे आभार सौ. पाटील एस. डी. मॅडम यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.

KK news प्रतिनिधी : कुणाल कांबळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…