मलकापूर प्रतिनिधी:
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मलकापूर येथील स्वयंसेवकांनी रक्षाबंधन उत्सवा निमित्त एक उपक्रम केला. डॉ.आंबेडकर नगर व आण्णाभाऊ साठे नगर या वस्त्यांमधील ६० घरांमध्ये जाऊन नागरिकांना राख्या बांधल्या व आपल्या समाजात बंधुभाव वाढीस लागण्याच्या दृष्टीने संवाद साधला तसेच रक्षाबंधनाचा संदेश देणारी पत्रके घरोघरी दीली, हा उपक्रम मंगळवार दि. २० ऑगस्ट २०२४ रोजी सायं. ७.३० ते ९.३० या वेळेत करण्यात आला.
या उपक्रमात श्री. महेश विभूते, मंगेश विभूते, चेतन भुर्के, रमण भोपळे, संदीप धनलोभ, रूपेश वारंगे , इंद्रजित रावण, सुहास जोशी, ओंकार जोशी व अनिल कुलकर्णी यांचा सहभाग होता.
त्याच बरोबर संघाचे शाहुवाडी तालुका कार्यवाह श्री, महेश विभूते व चैतन्य प्रभात शाखेचे कार्यवाह श्री. मंगेश विभूते या विभूते- बंधुंनी केश कर्तनालय चालवणारे श्री. सूरज माने यांना भोजनासाठी बोलावून श्री. सूरज माने व त्यांच्या पत्नीला विभूले कुटुंबियांनी राख्या बांधल्या.



