Home Kolhapur राधानगरी तालुक्यातुन मोठे मताधिक्य देऊ: श्री आर. के.मोरे(बापू )साहेब

राधानगरी तालुक्यातुन मोठे मताधिक्य देऊ: श्री आर. के.मोरे(बापू )साहेब

2 second read
0
1
702

२०एप्रिल २०२४

सरवडे तालुका राधानगरी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांचा राधानगरी तालुका प्रचार दौरा पार पडला. या प्रचार दौरा सभेत गोकुळ संघाचे व बिद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री आर. के. मोरे (बापू )साहेब आपल्या स्वागत पर मनोगतात काँग्रेस पक्ष हा वैचारिक पक्ष असून भारतीय स्वातंत्र्य लढ्यात या पक्षाचे मोठे योगदान असून भारताच्या विकासात काँग्रेस पक्षाचे मोठे योगदान आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचे जतन व संरक्षण करण्यासाठी व सर्व भारतीयांचे अधिकार सुरक्षित राहण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे सर्व भारतीयांनी ठाम उभे राहिले पाहिजे, राधानगरी तालुक्यात काँग्रेस पक्षाला विविध गट पाठिंबा देत असून होणाऱ्या निवडणुकीत छत्रपती शाहू महाराजांना राधानगरी तालुक्यातील मोठे मताधिक्य देऊ असा विश्वास त्यांनी दिला.

यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील साहेब यांनी आपल्या मनोगतात सध्याचे राजकारण हे फोडाफोडीचे असून, आपण समतेचा विचार पुढे नेहण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांना मतांच्या स्वरूपात पाठींबा देत असून राधानगरीतुन मोठे मताधिक्य देऊ असे स्पष्ट केले,यावेळी माझी परिषद सदस्य शिवानंद माळी, जनता दलाचे मा.वसंतराव पाटील,मा.शरद पाडळकर, मा.कपिल खोराटे, मा. सुनील शिंत्रे इ. आपले मनोगत व्यक्त केले.


या प्रचार दौऱ्यात, शिवसेनेचे ( उबाठा ) जिल्हाध्यक्ष विजय देवणे, विठ्ठलराव खोराटे, सदाशिवराव चरापले, पी.डी. धुंदरे, सुरेश चौगुले, अरुण गळदगे,सरवडे गावचे लोकनियुक्त सरपंच रणधीर विजयसिंह मोरे, इत्यादी प्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रा. टी. ए.मगदूम यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…