Home राजकारण लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024: मतदानासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुट्टी

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024: मतदानासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुट्टी

8 second read
0
0
406

कोल्हापूर, दि. 16 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यासाठीचे मतदान दिनांक 7 मे 2024 रोजी होणार आहे. या अनुषंगाने मतदानाच्या दिवशी संबंधित लोकसभा मतदार संघात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याची अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केली आहे.

xr:d:DAF3MoyTp_A:16,j:575747400636105177,t:23121705

ही सार्वजनिक सुट्टी संबंधित मतदार संघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदार संघाच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू राहील. तसेच ही अधिसूचना राज्य व केंद्र शासनाची सर्व कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम व इतर प्रतिष्ठान यांनाही लागू राहील, असेही या अधिसुचनेत स्पष्ट करण्यात आले असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

जयसिंगपूर : कुणाल कांबळे जयसिंगपूर येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि क्रिकेट या खेळातील एक ज…