Home राजकारण हे सरकार फेसबुक लाईव्ह करणारे नाही, फेस टू फेस काम करणारे आहे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

हे सरकार फेसबुक लाईव्ह करणारे नाही, फेस टू फेस काम करणारे आहे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 second read
0
0
385

दि १५ एप्रिल २०२४

कोल्हापूर हे एक शक्तिपीठ आहे हे शक्तिपीठ महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी आहे त्यामुळे दोन्ही उमेदवार नक्की विजयी होतील. सध्याचे सरकार हे फेसबुक लाईव्ह करणारे नाही तर फेस टू फेस काम करणारे आहे. अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली ते कोल्हापूर येथे बोलत होते. ते पुढे म्हणाले आपली निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर आहे विकासाचा अजेंडा घेऊन आपण पुढे जात आहोत. ज्या गोष्टी मागच्या 70 वर्षात घडल्या नाहीत त्या अवघ्या दहा वर्षात करून दाखवल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मोदींना प्रधान मंत्री बनवण्यासाठी महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना निवडून देऊया असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.

शिवसेना, भाजप, मनसे, रिपाई, रासप, रयत क्रांती, महाराष्ट्र क्रांती सेना महायुतीचे कोल्हापूर लोकसभे मतदार संघाचे अधिकृत उमेदवार संजय मंडलिक व हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे धैर्यशील माने यांचा उमेदवारी अर्ज मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करून आज दाखल करण्यात आला. गांधी मैदान पासून रॅली काढत अर्ज दाखल करण्यात आला. सकाळी नऊ वाजल्यापासूनच हातकणंगले व कोल्हापूर मतदारसंघातून कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली होती. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला होता. हे रॅलीमध्ये ‘मान गादीला, मत मोदीना’ या आषयाचे बोर्ड लक्ष वेधून घेत होते. महायुती च्या दोन्ही उमेदवारांनी रॅली सुरू असताना धर्मवीर संभाजी राजे, छत्रपती शिवाजी महाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले जातीची पातीची नात्याची ही निवडणूक नाही आहे, तर ही निवडणूक देशाची आहे, रयतेची निवडणूक आहे. त्यामुळे रयतेने दिलेले हे दोन उमेदवार नक्की निवडून आणूया आणि मोदींच्या हात बळकट करूया असे ते म्हणाले.


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक, धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक, माजी मंत्री चंद्रकांत दादा पाटील, माजी मंत्री हसन मुश्रीफ आमदार, मंत्री शंभूराजे देसाई, आमदार राजेश पाटील, प्रकाश आबिटकर, शिवसेनेचे नेते रामदास कदम, जनसुराज शक्तीचे अध्यक्ष विनयराव कोरे, आरोग्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, ताराराणी आघाडीचे आमदार प्रकाश आवाडे, माझी खासदार निवेदिता माने, रयत क्रांती संघटनेचे माजी मंत्री सदाभाऊ खोत, आमदार अमल महाडिक, माजी आमदार चंद्रदीप नरके, राज्य नियोजन महामंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, के पी पाटील भाजप जिल्हाध्यक्ष महेश जाधव, रिपाई जिल्हाध्यक्ष उत्तम दादा कांबळे, नगरसेवक सत्यजित कदम, रामराजे कुपेकर, संजय डी पाटील, जयसिंगपूर माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामी, जिल्हा परिषद सदस्य युवराज बापू पाटील, राहुल आवाडे, अशोकराव माने, राजवर्धन निंबाळकर, समरजीत सिंह घाटगे, वेदांतिका माने, युवा नेते सत्वशील माने, युवा नेते कृष्णराज महाडिक, युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, युवा सेना राज्य कार्यकारणी सदस्य शिवाजी जाधव, आरपीआय युवा आघाडी जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे, विजय जाधव, सुजित चव्हाण, मनसे हातकणंगले तालुका अध्यक्ष दौलतराव पाटील, तसेच महायुतीतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…