Home राजकारण आमदार आवाडेंच्या बंडखोरीमागे भाजपचीच ताकद तर नाही ना? राजकीय क्षेत्रात चर्चेला ऊत

आमदार आवाडेंच्या बंडखोरीमागे भाजपचीच ताकद तर नाही ना? राजकीय क्षेत्रात चर्चेला ऊत

9 second read
0
0
520

दि १५ एप्रिल २०२४

पाच वर्षांपूर्वी काँग्रेसच्‍या जिल्‍हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन अपक्ष आमदार झालेले व नंतर भाजपचे सहयोगी सदस्य राहिलेल्या प्रकाश आवाडे यांच्या बंडखोरीमागे नेमका कोणाचा हात आहे?, असा प्रश्‍न जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्राला पडला आहे.

आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे यांनी सुरुवातीला स्वतःच लोकसभा लढणार, अशी घोषणा केली होती. त्यासाठी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून लढण्याची तयारीही दर्शवली होती. पण, त्यापूर्वीच माने यांची महायुतीचे उमेदवार म्हणून घोषणा झाली होते. मात्र, अंतर्गत त्यांचा माने यांना असलेला विरोध कायम होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी ताराराणी आघाडीच्या माध्यमातून रिंगणात उतरण्याची घोषणा त्यांनी केली. कोल्हापूरच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही त्यांनी सहकुटुंब भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत राहुल आवाडे, त्यांच्या पत्नी मौसमी उपस्थित होत्या. बंद खोलीतील या चर्चेनंतरही आवाडे हे निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. एवढेच नव्हे, तर ते मंगळवारी अर्जही भरणार आहेत. त्यांचे हे धाडस पाहता, त्यांच्या मागे भाजपचीच ताकद तर नाही ना? असा प्रश्‍न पडत आहे.

आवाडे यांना भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करायचा आहे. पण स्थानिक पातळीवर माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यामुळे त्यांचा हा पक्ष प्रवेश रखडल्याचे बोलले जाते. आवाडे आपल्या निर्णयावर ठाम राहिल्यास या मतदारसंघाचे राजकीय गणित बिघडणार आहे, त्याचा फटका महायुतीला बसण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…