Home राजकारण प्रकाश आवाडेंची समजूत काढण्यास मुख्यमंत्र्यांना यश ; आवाडे लोकसभेच्या रिंगणाबाहेर

प्रकाश आवाडेंची समजूत काढण्यास मुख्यमंत्र्यांना यश ; आवाडे लोकसभेच्या रिंगणाबाहेर

3 second read
0
0
531

दि १५ एप्रिल २०२४

हातकणंगले मतदारसंघामध्ये दोन दिवस ठिय्या मांडून बसलेल्या प्रकाश आवडे याचे बंड मोडून काढण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आले आहे.हातकणंगले तालुक्यामध्ये ताराराणी पक्षाकडून आपण लोकसभेच्या मैदानात उतरल्याचं जाहीर करताच मुख्यमंत्र्यांनी स्वतः कोल्हापुरात येऊन आपले उमेदवार धैर्यशील माने यांच्यासाठी राजकीय जोडण्या लावल्या.

हातकणंगले मतदारसंघातील विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या उमेदवारीला गेल्या महिनाभरापासून आवाडे व त्यांच्या कुटुंबीयांकडून उघड विरोध केला जात होता. आवाडे यांचे पुत्र व माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी सुरुवातीला स्वतःच लोकसभा लढणार, अशी घोषणा केली. त्यासाठी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून लढण्याची तयारीही दर्शवली होती. पण, त्यापूर्वीच माने यांची महायुतीचे उमेदवार म्हणून घोषणा झाली होते. मात्र, अंतर्गत त्यांचा माने यांना असलेला विरोध कायम होता.

राहुल आवाडे यांनीच आमदार प्रकाश आवाडे हे लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी ताराराणी आघाडीच्या माध्यमातून रिंगणात उतरण्याची घोषणा त्यांनी केली होती. रविवारी कोल्हापूरच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही आवाडेंनी सहकुटुंब भेट घेतली. बंद खोलीतील या चर्चेनंतरही आवाडे हे निवडणूक लढण्यावर ठाम होते. एवढेच नव्हे, तर ते मंगळवारी अर्जही भरणार होते.

मुख्यमंत्र्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाले असून प्रकाश आवडे यांनी आता हातकणंगलेच्या लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली आहे. खासदार धैर्यशील माने याचं अर्ज आज दाखल केला जाणार असून मुख्यमंत्र्यांच्या आग्रहाखातर आमदार प्रकाश आवडे स्वतः माने याचा अर्ज दाखल करण्यासाठी जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…