मुंबई विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय वसतिगृहाला राजर्षी शाहू महाराज यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी AISF मुंबई आणि इतर संघटनांनी केलेली असताना सुद्धा मुंबई विद्यापीठ प्रशासनाने त्या वसतिगृहाला माफीवीर सावरकर यांचे नाव दिले, याच्या निषेधार्थ आज ऐतिहासिक दसरा चौक, कोल्हापूर येथे शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली.

तसेच या आंतरराष्ट्रीय वसतिगृहाला राजर्षी शाहू महाराज यांचेच नाव देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राची राजधानी मुंबईसंदर्भात काल केलेल्या विधानाचा यावेळी निषेध करण्यात आला, त्यानंतर कार्यकर्त्यांनी ऐतिहासिक शाहू समाधी स्थळाला भेट देऊन राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन केले.यावेळी जिल्हा अध्यक्ष हरिश कांबळे,राज्य कौन्सिल सदस्य आरती रेडेकर,जिल्हा सचिव धीरज कठोर,राज्य सचिव प्रशांत आंबी,आकाश भास्कर,गौतम कांबळे,श्रीकांत कोळी,सुनिल कोळी,स्नेहा काठारे,खुशी ठंग,सागर शितोळे उपस्थित होते.
कोल्हापुरी कारभारसाठी प्रतिनिधी मिलिंद कांबळे



