Home Uncategorized मलकापूरचे सामाजिक कार्यकर्ते रमेश नाईक यांना राज्यस्तरीय आत्मसन्मान गौरव पुरस्कार जाहीर

मलकापूरचे सामाजिक कार्यकर्ते रमेश नाईक यांना राज्यस्तरीय आत्मसन्मान गौरव पुरस्कार जाहीर

3 second read
0
0
181

मलकापूर प्रतिनिधी:

विश्वरन्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त संघर्ष नायक मिडीया, स्वराज्य क्रांती सेना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती (कोल्हापूर) तर्फे, या वर्षी या आत्मसन्मान गौरव पुरस्कार, मलकापूर ता. शाहुवाडी राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटनेचे ता. अध्यक्ष रमेश नाईक यांना जाहीर झाला.

सदर पुरस्कार प्रदान समारंभ १३ एप्रिल २०२४ रोजी १२ वा.शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे होणार आहे.रमेश नाईक यांनी प्रतिकुल परिस्थितीत उच्चशिक्षण घेतले, त्या शिक्षणाचा फायदा त्यांनी लोकांच्या समाज सेवेसाठी केला. आतापर्यंत हजारो लोकांना संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना अशा शासकीय योजनेचा लाभ मिळवून दिला. निराधार लोकांचा आधार म्हणून ओळखतात. तसेच पोलीस बॉईज असोसिएशनचे तालुका अध्यक्ष म्हणून उल्लेखनीय काम करतात. मलकापूर मध्ये सामाजिक व सांस्कृतिक कार्यात सक्रिय सहभाग घेत असतात, गेल्या वर्षीच छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते सामाजिक कार्याचा २०२३ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

मलकापूर–येळवण जुगाई रोडवरील पनुंद्रे फाटा येथे समोरून येणाऱ्या चारचाकी गाडीची धडक बसून साग…