Home Uncategorized हातकणंगलेच्या उमेदवारीसाठी” मातोश्री ” ची पायधुळ झाडायला सुरुवात….

हातकणंगलेच्या उमेदवारीसाठी” मातोश्री ” ची पायधुळ झाडायला सुरुवात….

3 second read
0
1
324

हातकणंगलेच्या उमेदवारीसाठी
” मातोश्री ” ची पायधुळ झाडायला सुरुवात….

30 मार्च 2024

कोल्हापूर: महाविकास आघाडीचा उमेदवार कोण याचा गुंता सुटताना दिसत नाही.दुसरीकडे महायुतीकडून खासदार धैर्यशील माने यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.
महाविकास आघाडी कडून उमेदवारी मिळावी यासाठी येथील मा.आमदार. डॉ. सुजित मिणचेकर, मा.आमदार.सत्यजित पाटील सरूडकर यांच्यासह आमदार प्रकाश आवाडे यांचे सुपुत्र राहुल आवाडे,मराठा क्रांती सेनेचे संस्थापक सुरेश दादा पाटील यांनी मातोश्री शी संपर्क करण्यास सुरुवात केला आहे.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खासदार धैर्यशील माने विरुद्ध माजी खासदार राजू शेट्टी यांच्यात मुख्य लढत असणार आहे.यामध्ये महाविकास आघाडी कडून शेट्टी यांना पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली असली तरी त्यांना काँग्रेस व राष्ट्रवादीचा पाठिंबा नको आहे.शेट्टी यांना गत निवडणुकीत कटू अनुभव आला आहे. त्यामुळे शेट्टी यांना केवळ शिवसेनेचा पाठिंबा हवा आहे.
केके न्यू साठी प्रतिनिधी मिलिंद कांबळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

सूर्यकांत उदगावे यांची शरद सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी निवड

नरंदे येथील शरद सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी शिरटी ता. शिरोळ येथील प्रतिष्ठित नागरि…