Home Uncategorized गोकुळ’च्या प्रगतीत दूध संस्था कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान:अरुण डोंगळे चेअरमन गोकुळ दूध संघ

गोकुळ’च्या प्रगतीत दूध संस्था कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान:अरुण डोंगळे चेअरमन गोकुळ दूध संघ

3 second read
0
0
67

संघाच्या वतीने दूध संस्थांच्या व्यवस्थापन खर्चात प्रतिलिटर १० पैसे व कर्मचाऱ्यांसाठी प्रतिलिटर ५ पैसे अशी वाढ केली. याबद्दल दूध संस्था कर्मचारी संघटनेच्या वतीने अध्यक्ष अरुण डोंगळे व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्यासह अन्य संचालकांचा संघटनेचे अध्यक्ष केरबा पाटील, शामराव पाटील, विश्वास पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संघाचे अध्यक्ष डोंगळे म्हणाले की, ‘गोकुळ’च्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त संबंधित सर्व घटकांना लाभ देण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यात संघाच्या विविध योजनांची माहिती दूध उत्पादकापर्यंत पोहोचवून संघाच्या दूध वाढीसाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे. आभार संघटनेचे सेक्रेटरी विश्वास पाटील यांनी मानले.
यावेळी संचालक शशिकांत पाटील चुयेकर, बयाजी शेळके, संघटनेचे सुरेश जाधव, तानाजी गुरव, सरदार देसाई, संजय पानारी, मंगेश बेंडखळे, मोहन धुंदरे, शिवाजी गायकवाड व संघटनेचे कर्मचारी उपस्थित होते.
केके न्यूज साठी प्रतिनिधी मिलिंद कांबळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

दुग्धतंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे गोकुळ दूध संघ तसेच इंडियनडेअरी असोसिएशनचे…