Home Uncategorized गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांचा दूध संस्था कर्मचारी संघटनेच्या वतीने सत्कार…

गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांचा दूध संस्था कर्मचारी संघटनेच्या वतीने सत्कार…

17 second read
0
0
72

गाय दूध अनुदानात काम करणाऱ्या दूध संस्थांना शासनामार्फत मोबदला मिळवण्यासाठी गोकुळने पाठपुरावा केलेबद्दल कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटनेच्या वतीने गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व संचालक मंडळ यांचा सत्कार संघटनेचे अध्यक्ष केरबा पाटील व संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते गोकुळ प्रकल्प, गोकुळ शिरगाव येथे करण्‍यात आला. यावेळी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, शासनाच्या गाय दूध अनुदान प्रकियेमध्ये प्राथमिक दूध संस्था महत्वाची भूमिका बजावत असून त्यांच्या प्रयत्नातून दूध उत्पादकांना हे थेट अनुदान मिळण्यास मदत होत आहे. दूध संस्था कर्मचारी यांनी संस्था पातळीवरील कामकाजामध्ये गतिशीलता आणून जास्तीत जास्त दूध उत्पादकांना अनुदान मिळवून देण्यास प्रयत्नशील राहावे असे आवाहन केले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष केरबा पाटील म्हणाले कि, गोकुळ ने नेहमीच दूध उत्पादक, प्राथमिक दूध संस्था, संस्था कर्मचारी या सर्वाचे हित जपले असून दूध संस्था कर्मचारी संघटनेला गोकुळचे नेहमीच सहकार्य लाभले आहे. गाय दूध अनुदानात काम करणाऱ्या दूध संस्थांना शासनामार्फत मोबदला मिळवण्यासाठी गोकुळने यशस्वी पाठपुरावा केलेबद्दल गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व सर्व संचालक मंडळ याचे आभार व्यक्त केले.याप्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, जेष्‍ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, सौ. शौमिका महाडिक, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, संघटनेचे अध्यक्ष केरबा पाटील, शामराव पाटील,विश्वास पाटील, सुरेश जाधव, संघटनेचे पदाधिकारी, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.—————————————————————————————————————-फोटो ओळ – संघटनेच्या वतीने गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, जेष्‍ठ संचालक विश्वास पाटील, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, यांचा सत्कार करताना संघटनेचे अध्यक्ष केरबा पाटील, शामराव पाटील,विश्वास पाटील आदी दिसत आहेत.—————————————————————————————————————– दिनांक -१३/०३/२०२४.प्रति, मा. संपादकसो,दैनिक/इलेक्‍ट्रॉनिक मिडीया/ वेब.कृपया वरील बातमी आपल्‍या लोकप्रिय दैनीकामध्‍ये फोटोसह प्रसिध्‍द करावे ही विनंती.कळावे, जनसंपर्क अधिकारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…