Home Uncategorized शाहुवाडी-पन्हाळा साठी पहिली अयोध्या रेल्वे रवाना

शाहुवाडी-पन्हाळा साठी पहिली अयोध्या रेल्वे रवाना

5 second read
0
0
114

मलकापूर प्रतिनिधी

२२ जानेवारी २०२४ रोजी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा सोहळा साजरा करण्यात आला. देशातील रामभक्त भाविकांना दर्शन घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली, जिल्हा सरचिटणीस शहाजी भोसले यांच्या नियोजनातून व शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा प्रमुख प्रवीण प्रभावळकर यांच्या सहकार्याने रेल्वेची सोय करण्यात आली.

त्या पार्श्वभूमीवर शाहूवाडी-पन्हाळा तालुक्यातील रामभक्तांना दर्शनासाठी रेल्वेने जाण्याची सोय करण्यात आली.यावेळी प्रभू श्रीराम चंद्रांचा अखंड जयघोष करत भगवे ध्वज, भगव्या टोप्या अशा धार्मिक वातावरणात आस्था रेल्वे सकाळी ११ वा. रवाना झाली.

यावेळी जिल्ह्यातील जवळपास १३५० रामभक्त, दर्शनासाठी रवाना झाले. रेल्वे मधील सर्वांच्या भोजन, निवासाची व्यवस्था पक्षाकडून करण्यात आली आहे. कोल्हापूर छत्रपती महाराज रेल्वे स्टेशनवर सर्व राम भक्तांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन विस्तारक राजेंद्र पाटील यांनी केले. अयोध्या दर्शन संयोजक व सहसंयोजक म्हणून शाहूवाडी चे विजय रेडेकर, संजय खोत, दाजी चौगुले, विवेक कुलकर्णी, विनायक पाटील व रेल्वे स्थानकात सहकार्य रोहित पास्ते यांचे लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

मलकापूर प्रतिनिधी:रोहित पास्ते आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाहूवाडी तालुक्यातील सर्…