Home वायरल सन्मान देवदुताचा : लैबक इमदाद फाउंडेशन हुपरी यांच्यावतीने सत्कार

सन्मान देवदुताचा : लैबक इमदाद फाउंडेशन हुपरी यांच्यावतीने सत्कार

2 second read
0
0
87

जनता विद्यालयाचे शिक्षक आर.ए. पाटील, डी.टी. पाटील, विलास ठोंबरे ,के.एस. पाटील, दीपक तोडकर ,राजाराम आरगे, शासनाच्या आदेशानुसार शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या प्रत्येक भागात सर्वे करण्यासाठी गेले होते . दीपक तोडकर व राजाराम आरगे माने नगर या भागात सर्वे करण्यासाठी गेले होते.माने नगर मधील शिंदे यांच्या घराजवळ सर्वे करत होते. यावेळी त्यांच्या निदर्शनास शिंदे कुटुंबातील एका तरुणाच्या छातीमध्ये तीव्र वेदना होऊ लागल्या आणि तो चक्कर येऊन जमिनीवर पडला.

अंगाला घाम सुटलेला होता. त्या तरुणाची पूर्णपणे हालचाल थांबलेली होती. अशावेळी महिलांची धांदल उडाली आरडाओरडा सुरू झाला होता.घरातील पुरुष मंडळी कामानिमित्त बाहेर गेलेले होते. जनता विद्यालयाचे शिक्षक दीपक तोडकर व राजाराम आरगे हे त्या तरुणाच्या जवळ गेले व त्यांच्या लक्षात आले हृदविकाराची झटक्याची लक्षणे असावी हा अंदाज करून तोडकर सरांनी छातीवर दाब देत हाताने पंपिंग सुरू केले. ही क्रिया त्यांनी जवळजवळ तीन मिनिटे केली. आश्चर्य निपचित पडलेल्या तरुण दीर्घ श्वास घेऊ लागला. हळूहळू श्वास घेऊ लागला . ताबडतोब या तरुणाला दवाखान्यात हलविण्यात आले या घटनेमुळे तरुणाला जीवदान मिळाले या शिक्षकांच्या धाडसाबद्दल त्यांच्या कुटुंबातील लोकांना अक्षरशः अश्रू अनावर झाले. सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यांच्या कार्याची दखल घेत आज लैबक फाउंडेशन हुपरी यांच्यावतीने जनता विद्यालयाचे शिक्षक राजाराम आरगे दीपक तोडकर यांचा सत्कार करण्यात आले.

लैबक फाउंडेशन हुपरी अध्यक्ष इरशाद शेख , अशरफ कलावंत. आरीफ मुल्ला. जनता विद्यालयाचे शिक्षक आर. ए. पाटील, डी. टी .पाटील, विलास ठोंबरे,के ‌एस. पाटील,आमीर सनदी. शब्बीर कलावंत. आसिफ जमादार. असगर केरुरे. अमन शेख,अकबर फरास, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते .कोल्हापुरी कारभार साठी हुपरी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…