Home Uncategorized कोल्हापूरच्या युथ आयकॉनचा राजकारणात प्रवेश… !

कोल्हापूरच्या युथ आयकॉनचा राजकारणात प्रवेश… !

3 second read
0
2
2,224

कोल्हापूर : राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक यांची ओळख इंडियाचा रेसिंग स्टार व युथ आयकॉन म्हणून सर्वदूर पसरलेली आहेच. पण आता कृष्णराज देखील राजकारणाचे वेड लागले आहे. महाडिक परिवारातील कृष्णराज देखील आता राजकारणात उतरणार अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.

नुकताच कोल्हापुरातील शाहू स्टेडियम येथे सुरू झालेल्या के.एम चषक आणि राज्य सरकारकडून आणलेल्या कोल्हापूर शहराच्या रस्त्यासाठी 25 कोटी निधी याचे पोस्टर्स कोल्हापुरात झळकत आहेत आणि त्याच पोस्टरवर “आता सुट्टी नाही” असे मजकूर दिसत असल्याने कोल्हापुरात चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे कृष्णराज महाडिक राजकारणात सक्रिय होण्याचे स्पष्ट संकेत दिसत असल्याचे समजते.

कृष्णराज महाडिक हे नेहमीच चर्चेत असतात. करोना काळात त्यांनी युट्युबच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा एक चाहतावर्ग निर्माण झाला आहे. युट्युब च्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशातून त्यांनी समाजकार्य देखील केले, ज्यामुळे संपूर्ण तळागळातून त्यांचे भरभरून कौतुक देखील करण्यात आले.

आपल्या वडिलांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सध्या कृष्णराज कोल्हापुरातील सामाजिक कार्यांमध्ये अग्रेसर असल्याचे दिसून येते. नुकताच त्यांनी कोल्हापुरातील रस्त्यांसाठी 25 कोटी निधी मंजूर केला आहे. त्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोल्हापूर येथील संघर्ष महामोर्चाला शिरोळ तालुक्यातून दोन हजार कार्यकर्ते जाणार….

शिरोळ : प्रतिनिधी खोट्या जात प्रमाणपत्रांच्या आधारे निवडणुका लढवून संवैधानिक आरक्षण व्यवस्…