Home Uncategorized दूधगंगा काठावर महिलांचे उपोषण, इचलकरंजी पाणी पुरवठा योजनेला विरोध..

दूधगंगा काठावर महिलांचे उपोषण, इचलकरंजी पाणी पुरवठा योजनेला विरोध..

3 second read
0
0
326

इचलकरंजी शहरासाठी दूधगंगा नदीचे पाणी मिळावे, म्हणून इचलकरंजी वासियांकडून सतत प्रयत्न सुरूच आहेत; परंतु “दुधगंगा नदीचे पाणी आम्ही देणार नाही”, अशा आक्रमक भूमिकेत दूधगंगा नदीकाठच्या महिलांनी इचलकरंजी पाणी योजनेला विरोध दर्शवला आहे.

सुळकुड धरणा शेजारी झालेल्या या आंदोलनात महिला मोठा संख्येने सहभागी झाल्या असल्याने, त्या सर्वांनी एकमताने “आम्ही दूधगंगेचे पाणी देणार नाही, इचलकरंजीसह कोणालाच आमच्या हक्काच्या पाण्याचा थेंबही देणार नाही”, अशा शब्दात यावेळी घोषणा दिल्या.

इचलकरंजी शहरातील महिला सुळकुड योजनेच्या मागणीसाठी उपोषणा बसल्याने, त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी शहराला शुद्ध पाणी देण्याची ग्वाही दिल्याने सुळकुड योजना यशस्वी होईल, असा आशावाद निर्माण झाला आहे. परंतु दुसरीकडे दूधगंगा काठावरील महिला पाणी देणार नाही म्हणून आक्रमक झाल्याचे चित्र दिसत आहे.

“वेळ पडल्यास पुरुषांसोबत रस्त्यावर उतरू, पण दूधगंगेचे पाणी देणार नाही”, अशा भावना यावेळी महिलांनी व्यक्त केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…