Home Uncategorized शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबार विरोधात इंडिया आघाडीची निदर्शने..

शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबार विरोधात इंडिया आघाडीची निदर्शने..

3 second read
0
0
68

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला किमान आधारभूत किंमत (एमएसपी) मिळावी यासाठी दिल्ली-हरियाणा बॉर्डर वर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. आंदोलनकारी शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी भाजप सरकारने शेतकऱ्यांवर ड्रोनद्वारे अश्रूधुराचे नळकांडे रब्बर पॅलेट्सचा वापर केला जात आहे.

या अमानुष प्रकाराने अनेक शेतकऱ्यांना आपले डोळे गमवावे लागले आहेत. यातच पोलीसांच्या गोळीबारात शुभकरण सिंग या तेवीस वर्षीय आंदोलकाचा मृत्यू झाला.आज इंडिया आघाडीच्या वतीने या गोळीबारा विरोधात बिंदू चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली.

शेतकऱ्यांवर गोळीबार करणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो, स्वामीनाथन आयोग लागू न करणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो च्या घोषणा आंदोलकांनी लगावल्या.दिलीप पवार, उदय नारकर, विजय देवणे, सचिन चव्हाण, संदीप देसाई, सुनील मोदी, बाबुराव कदम, सुभाष देसाई यांची भाषणे झाली.यावेळी अरुण गळतगे, उदय पोवार, इस्थेर कांबळे, उषा वडर, अक्षय शेळके, किरण साळोखे, विजयानंद पोळ, सर्फराज रिकीबदार, अभिजित कांबळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…