Home Uncategorized शिवचरित्र हे राष्ट्रीय चरित्र : प्रफुल्ल खपके

शिवचरित्र हे राष्ट्रीय चरित्र : प्रफुल्ल खपके

4 second read
0
0
125

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित विचारांचा जागर करून घराघरात शिवराय मनामनात शिवराय व शिव विचार, आदर्श शासन, लोककल्याणकारी राजा पोहोचवण्यासाठी सुवर्ण सप्ताह च्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यानमाला संपन्न होत आहे या पार्श्वभूमी चंद्ररूप डाकळे जैन कॉलेज ऑफ कॉमर्स महाविद्यालयामध्ये व्याख्यानाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रफुल्ल प्रकाश खपके यांनी छत्रपती शिवाजी महाराज युवकांचे प्रेरणास्थान या विषयावर मांडणी केली.

आज 21 व्या शतकात तंत्रज्ञान भिमुख वागत असताना सर्व सुखसुविधा पूरक विद्यार्थी महाविद्यालय स्तरावर आपण बघत आहोत. त्यांच्या पालकांनी विद्यार्थी जीवनात अनुभवलेल्या अडचणी आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये आणि आपल्या मुलांनी यशाची उत्तुंग शिखरे गाठावगाठावी या भूमिकेतून पालक अपेक्षित सर्व सुख-सुविधा विद्यार्थी म्हणून आपल्या पाल्यांना पुरवत असतात.

आज विद्यार्थी सोशल मीडिया, नेटवर्किंग साईट अर्थात तंत्रज्ञानामुळे वेगवेगळ्या गोष्टींमध्ये रुची घेऊ लागला आहे या स्थितीत आपण इतिहासाकडे वळून बघितल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेणे क्रमप्राप्त ठरते. छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेसातशे वर्षाचा पारतंत्र्य अवघ्या 35 वर्षांमध्ये हटवले जगाच्या इतिहासात सर्वात कमी कालखंडामध्ये झालेली सर्वात मोठी क्रांती म्हणून इतिहास आणि शिवकालीन स्वराज्याची नोंद घेतली. महाराजांनी नॅशनल कॅरेक्टर्स निर्माण केले होते. हत्ती सोबत झुंज देणारे यसाजी कंक असतील, 2000 सैन्याशी एक हाती झुंज देणारे बाजीप्रभू देशपांडे, आपला हात तुटला तरी शत्रूशी लढत राहणारे तानाजी मालुसरे, मुघलांच्या कडक बंदोबसातून सोन्याचा कळस कापून नेताना मुघलांच्या काळजाचा थरकाप उडवणारे आणि मुघलांच्या घोड्यांना पाणी पिताना पाण्यातही दिसणारे संताजी धनाजी, मृत्यू समोर आहे हे माहिती असतानाही पालखीमध्ये बसणारे शिवा काशीद, शत्रूच्या तोफेचा गोळा आपल्या छातीवर झेलून मरणाला मिठी मारणारे सरसेनापती हंबीरराव मोहिते, वाघाच्या जबड्यात घालुनी हात मोजणारे दात छत्रपती संभाजी राजे असे शूरवीर, निष्ठावंत राष्ट्रीय चारित्र्य महाराजांनी निर्माण केले.

स्वराज्यामध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण नव्हते पण छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांना शंभर टक्के संरक्षण देण्याचे काम केलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचे शेतकऱ्या बद्दल असलेले धोरण अर्थात शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीलाही हात लावता कामा नये ही सर्व सैन्याला दिलेली सूचना असेल तसेच जगाच्या पाठीवर असा पहिला राजा आहे ज्याला समजलं होतं सैनिक हे पोटावरती चालतात पोट भरलेले असतील तर पाठीचे कणे टाईट राहतात. महाराजांनी निर्माण केलेल्या गुप्तचर विभागाची आज बोटावर मोजता येइल इतकी माहिती उपलब्ध होते हेच खऱ्या अर्थाने शिवकालीन गुप्तचर विभागाचे यश आपल्याला बघायला मिळते.

स्वराज्याची राजधानी रायगड बांधायला घेतल्यानंतर स्वतःच घरदार सर्वस्व अर्पण करून राजधानी उभी करणारे आणि स्वतःसाठी काहीतरी मागण्याची वेळ आल्यानंतर फक्त रायरेश्वर मंदिराच्या पायरीला सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर असा मजकूर लिहिलेला एक छोटासा दगड लावायची मागणी करणारे हिरोजी इंदुलकर निष्ठेचे विद्यापीठ म्हणून समोर येतात. खऱ्या अर्थाने हा शिवकालीन इतिहास तरुणांच्या ओठावरती आला पाहिजे त्यातून उद्याचे नेतृत्व व कर्तुत्व बहरले पाहिजे हा विचार पालकांनी व शिक्षकांनी आपल्या पाल्यांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावा हा संदेश व्याख्यानाच्या माध्यमातून देण्यात आला. कार्यक्रमाचा समारोप व आभार प्रदर्शन महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

मलकापूर–येळवण जुगाई रोडवरील पनुंद्रे फाटा येथे समोरून येणाऱ्या चारचाकी गाडीची धडक बसून साग…