Home Uncategorized भाजपात आता काहीजण आले.. काही दिवसात अवघे येणार – धनंजय महाडिकांचे मोठे विधान..

भाजपात आता काहीजण आले.. काही दिवसात अवघे येणार – धनंजय महाडिकांचे मोठे विधान..

2 second read
0
1
1,475

कोल्हापूर – “राजकारणात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे भवितव्य आता भाजपमध्ये आहे, हे लोकांना दिसत आहे म्हणूनच त्यांचा कल भाजपकडे वाढतो आहे”, भाजप खासदार धनंजय महाडिक यांचे प्रतिपादन.

खा. महाडिक म्हणाले, “काही दिवसापूर्वी अजित दादा आपल्या सर्व आमदारांसह भाजपला समर्थन देत प्रेवश केला आहे, तसेच बाबा सिद्धकी आले, अगदी कालच अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला. पुढच्या काळात अनेक लोक येतील असे चित्र आता तरी दिसत आहे. जे वातावरण आता राज्यात निर्माण झालेला आहे त्यात कोल्हापूर अपवाद असेल असे मला वाटत नाही.

“भारताला एका उच्च पातळीवर नेऊन ठेवण्यासाठी भाजपाने अनेक विकासकामे केली आहेत, म्हणूनच सर्व राजकीय कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टी हेच या भारताचे भवितव्य आहे, हे समजले आहे” असे मत मांडत खा. महाडिक यांनी भाजपात येत्या काळात आणखी खूप सारे राजकीय नेते प्रवेश करतील, अशी दाट शक्यता व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…