Home Uncategorized ‘पद्मश्री नामदेव ढसाळ विशेष काव्य पुरस्कार’ हा प्रा.चंद्रशेखर कांबळे ( राधानगरी) यांच्या ‘शेणाला गेलेल्या पोरी’ या दिर्घ कविता संग्रहाला जाहिर….

‘पद्मश्री नामदेव ढसाळ विशेष काव्य पुरस्कार’ हा प्रा.चंद्रशेखर कांबळे ( राधानगरी) यांच्या ‘शेणाला गेलेल्या पोरी’ या दिर्घ कविता संग्रहाला जाहिर….

5 second read
0
0
138

महाराष्ट्र साहित्य परिषद, राजगुरुनगर,पुणे यांच्या वतीने दिला जाणारा साहित्य क्षेत्रातील अत्यंत महत्वाचा असलेला ‘पद्मश्री नामदेव ढसाळ विशेष काव्य पुरस्कार’ हा प्रा.चंद्रशेखर कांबळे ( राधानगरी) यांच्या ‘शेणाला गेलेल्या पोरी’ या दिर्घ कविता संग्रहाला जाहिर झाला आहे. परिषदेचे अध्यक्ष संतोष गाढवे यानी या पुरस्काराची अधिकृत घोषणा केली असून शाल,श्रीफळ,सन्मान चिन्ह,रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

कांबळे हे येथील महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक असून शासनाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने,प्रकाशन समितीचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत.शेणींच्या प्रतिकामधून त्यांनी स्त्री जीवनाच्या भावविश्वाचे विविध कंगोरे या दिर्घकविता संग्रहात चित्रित केलेले आहेत.

यापूर्वी या संग्रहाला कविवर्य नारायण सुर्वे (पुणे), कवयित्री शांता शेळके (मंचर), दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा (कोल्हापूर) राजर्षी शाहू (शाहूवाडी ) मायबाप व गावगाडा ( सोलापूर ) जमदाडे प्रतिष्ठान नांदेड असे विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

ढसाळ यांची जन्मभूमी असलेल्या पुणे जिल्ह्यातील कनेरसर, राजगुरुनगर येथे 11 फेब्रुवारी 2024 रोजी होणाऱ्या विशेष कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…