Home Uncategorized मराठा आरक्षणासाठी राधानगरी तालुक्यात किती मराठा कुटुंबांचे सर्वेक्षण झालंय पहा..?

मराठा आरक्षणासाठी राधानगरी तालुक्यात किती मराठा कुटुंबांचे सर्वेक्षण झालंय पहा..?

3 second read
0
0
182

राशिवडे प्रतिनिधी कृष्णा लाड

महाराष्ट्र शासनाच्या अध्यादेशानुसार राधानगरी तालुक्यात मराठा आरक्षणासाठी सर्वे करण्यात आला होता. त्या सर्वे मध्ये एकूण43389 मराठा कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण झालेले आहे त्यामुळे तालुक्यातील हे प्रमाण जवळपास शंभर टक्के इतकं आहे. या सर्वेक्षणासाठी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद विभागातील कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, शिक्षक अशा विविध घटकांनी प्रगनक म्हणून काम पाहिले. राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील सर्वेक्षण अंतिम मुदतीत पूर्ण झालेले असून सन 2011 च्या जनगणनेनुसार नोंदीत असणाऱ्या मराठा समाजातील एकूण कुटुंबांपैकी शंभर टक्के सर्वेक्षण झालेले आहे. या सर्वेक्षणासाठी विविध विभागातील 435 कर्मचारी प्रगनक होते. आणि या सर्वांच्या समन्वयातूनच सर्वेक्षणाचे काम हे दिलेल्या मुदतीत पूर्ण झाले असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…