Home Kolhapur बुरंबाळी आश्रमामध्ये ज्ञान संस्कार व अध्यात्म या त्रिसूत्रीचा संगम

बुरंबाळी आश्रमामध्ये ज्ञान संस्कार व अध्यात्म या त्रिसूत्रीचा संगम

4 second read
0
0
521

धामोड वार्ताहर, श्री गगनगिरी महाराज सेवा ट्रस्ट बुरंबाळी या आश्रमाचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला. ज्ञान संस्कार व अध्यात्म या त्रिसूत्रीचा संगम बुरंबाळी आश्रमामध्ये झालेला आहे याचा लाभ सदाचरण करणाऱ्या सद्गुनी नागरिकांनी घ्यावा आणि आपले जीवन कृतार्थ बनवावे असे आवाहन या आश्रमाच्या वर्धापन दिनी एकत्रीत आलेल्या साधू संतांनी आपल्या विचारातून व्यक्त केले.

यावेळी सकाळी अभिषेक काकड आरती .श्री मूर्तिवर मंगलस्नान व पादुकावर अभिषेक, गगनगिरी याग, संपन्न झाला, विविध धार्मिक कार्यक्रमांमधून या कार्यक्रमाची सुरुवात झाली या कार्यक्रमास परिसरातील विविध भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रक्तदान शिबिर मोफत आरोग्य शिबिर ॲक्युप्रेशर व अँक्युपंक्चर शिबिर याचा लाभ भक्तांनी घेतला या आश्रमाचे मठाधिपती श्री सदानंदगिरी महाराज यांनीआयोजन केले होते, या आश्रमाच्या स्थापनेचा उद्देश आश्रमाचा हेतू व पुढील दिशा, विविध उपक्रम याची माहिती प्रा.श्री.अण्णासाहेब भागाजे सर यांनी सांगितली मान्यवरांचा सत्कार शाळकरी मुलांना बक्षिस वितरण करण्यात आले तसेच घानवडे इंग्लिश स्कूलच्या वतीने मोबाईलचे दुष्परिणाम, कॅन्सर कसा रोखला पाहिजे याचे पथनाट्य सादर केले नंतर महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास श्री. क्षेत्र गगनगडावरील ट्रस्टी सर्वश्री संजयसिंह पाटणकर, श्री.रमेशराव माने झांजूचे पाणी आश्रमाचे श्री दिपक महाराज, ओणी आश्रमाचे श्री उल्हासगिरी महाराज,दिवशी आश्रमाचे श्रीदयानंदगिरी महाराज, किटाचे रान-दाजीपूर आश्रमाचे श्रीआझादगिरी महाराज, लोणावळा आश्रमाचे श्री अशोकानंद सरस्वती महाराज, ओझर्डे आश्रमचे शामगिरी महाराज बुरंबाळी ग्रामस्थ,व विविध भागातून येणारी गगनगिरी सेवेकरी मंडळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…