Home टेकनॉलॉजि कष्टानं पिकवलेला शेकडो क्विंटल शेतमाल पाण्यात…

कष्टानं पिकवलेला शेकडो क्विंटल शेतमाल पाण्यात…

4 second read
0
0
839

वाशिम शहरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीला आलेले शेकडो क्विंटल सोयाबीन, हराबऱ्याचा शेतमाल भिजला आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत शेतमाल भिजल्याने ते हवालदिल झाले आहेत.

वाशिममध्ये दुपारपर्यंत वातावरण स्वच्छ होतं. पण नंतर असताना अचानक सोसाट्याचा वारा सुटून पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे वाशिमच्या बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. कृषी उत्पन्न बाजार समितीतील ओट्यावर सोयाबीन, हरभऱ्यासह इतर शेतमाल भिजून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान आहे.

आता भिजलेल्या शेतमालाची व्यापाऱ्यांनी खरेदी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. दरम्यान, बाजार समितीच्या ओट्यावर व्यापाऱ्यांचा माल असल्याने शेतकऱ्यांना आपला शेतमाल ओट्याच्या खाली टाकावा लागत आहे. त्यामुळे बाजार समिती प्रशासनाने पाण्यात वाहून गेलेल्या सोयाबीनची भरपाई द्यावी, अशीही मागणी शेतकरी करत आहेत. या आधीही अनेकदा असेच प्रकार घडल्याने बाजार समिती विरोधात शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…