Home Uncategorized ‘मुख्यमंत्री वैद्यकीय’चे प्रमुख मंगेश चिवटे रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर

‘मुख्यमंत्री वैद्यकीय’चे प्रमुख मंगेश चिवटे रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर

4 second read
0
0
229

गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक विश्वास पाटील यांच्या मातोश्री कै. जनाबाई पाटील यांच्या १४स्मृतिदिनानिमित्त येत्या रविवारी १७ डिसेंबर रोजी भव्य रक्तदान व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता विभागाचे प्रमुख आणि मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम होणार असल्याची माहिती विश्वास पाटील यांनी दिली. श्रीमती जनाबाई नारायण पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी विश्वास नारायण पाटील फाउंडेशनच्या वतीने हा उपक्रम नियोजित केला जातो. 500 हून अधिक बॉटल रक्तसंकलन होते. एकनाथ विद्यालय शिरोली दुमाला कोल्हापूर या ठिकाणी सकाळी आठ वाजता होणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन शिरोली दुमाला गावाचे लोकनियुक्त सरपंच सचिन पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…